Megablock 16 January 2022 : प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवार १६ जानेवारी रोजी आहे रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 15, 2022 | 14:26 IST

Mumbai Railway Megablock : Central Line Harbour Line Trans Harbour Line Western Line : 16 January 2022 : रेल्वे मार्ग तसेच रेल्वेच्या यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या म्हणजेच रविवार १६ जानेवारी २०२२ रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (मेन लाइन) तसेच हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक आहे.

Mumbai Railway Megablock : Central Line Harbour Line Trans Harbour Line Western Line : 16 January 2022
प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवार १६ जानेवारी रोजी आहे रेल्वेचा मेगाब्लॉक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवार १६ जानेवारी रोजी आहे रेल्वेचा मेगाब्लॉक
  • मेगाब्लॉक आणि जम्बोब्लॉकमुळे काही गाड्या रद्द होतील तर काही गाड्यांच्या प्रवास मार्गात आणि वेळांमध्ये बदल
  • प्रवाशांनी वाहतुकीतील बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे

Mumbai Railway Megablock : Central Line Harbour Line Trans Harbour Line Western Line : 16 January 2022 : मुंबई : रेल्वे मार्ग तसेच रेल्वेच्या यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या म्हणजेच रविवार १६ जानेवारी २०२२ रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर (मेन लाइन) तसेच हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक आहे.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डाऊन फास्ट मार्गावर सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ दरम्यान जाणाऱ्या गाड्या माटुंगा येथून स्लो ट्रॅकवर वळविण्यात येतील. या गाड्या पुढे मुलुंड पर्यंतच्या सर्व स्टेशनवर थांबतील. यानंतर ठाण्याच्या पुढे फास्ट असलेल्या गाड्या पुन्हा डाऊन फास्ट मार्गावरुन पुढे जातील. या बदलामुळे गाड्या त्यांच्या नियोजीत वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिराने डेस्टिनेशनवर (गंतव्य स्थान) पोहोचतील.

ठाणे येथून अप फास्ट मार्गावर जाणाऱ्या गाड्या सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत मुलुंड येथून माटुंगा पर्यंत अप स्लो मार्गावरुन सर्व स्टेशनवर थांबत पुढे जातील. माटुंगा येथून पुन्हा अप फास्ट मार्गावरुन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जातील. या बदलामुळे गाड्या त्यांच्या नियोजीत वेळेपेक्षा पंधरा मिनिटे उशिराने डेस्टिनेशनवर (गंतव्य स्थान) पोहोचतील.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डाऊन स्लो मार्गावर वाशी/बेलापूर/पनवेल साठी सकाळी ११.१६ ते संध्याकाळी ४.४७ पर्यंत गाडी नसेल. तसेच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून डाऊन स्लो मार्गावर वांद्रे/गोरेगाव साठी सकाळी १०.४८ ते संध्याकाळी ४.४३ पर्यंत गाडी नसेल. 

पनवेल/बेलापूर/वाशी येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप स्लो मार्गावर सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत गाडी नसेल. तसेच गोरेगाव/वांद्रे येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप स्लो मार्गावर सकाळी १०.४५ ते संध्याकाळी ५.१३ पर्यंत गाडी नसेल. 

ब्लॉकच्या काळात पनवेल ते कुर्ला या मार्गावर प्लॅटफॉर्म क्रमांक आठ वरुन विशेष गाड्या धावतील. हार्बरच्या प्रवाशांना ब्लॉक असल्यामुळे सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरुन तसेच पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमधून प्रवास करता येईल.

सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन फास्ट मार्गावर जम्बोब्लॉक आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हा ब्लॉक आहे. ब्लॉक काळात स्लो मार्गावरील वाहतूक सुरू राहील. पण काही गाड्या रद्द केल्या जातील.

मेगाब्लॉक आणि जम्बोब्लॉकमुळे काही गाड्या रद्द होतील तर काही गाड्यांच्या प्रवास मार्गात आणि वेळांमध्ये बदल केले जातील. प्रवाशांना स्टेशनवर रेल्वे नियंत्रण कक्षाकडून होणाऱ्या घोषणा तसेच स्टेशनमास्तर आणि चौकशी कक्ष या ठिकाणी या संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकेल. प्रवाशांनी वाहतुकीतील बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी