Cracked track in Govandi : मुंबईत गोवंडी येथे रुळाला तडे गेल्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गाड्या किमान वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दररोज नोकरी, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने हजारो नागरिक हार्बर मार्गाने प्रवास करतात. सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रुळाला तडे गेले आहेत. यामुळे डाऊन गाड्यांचा सकाळीच गोंधळ सुरू झाला आहे. डाऊन मार्गावरील गोंधळाचा फटका अप मार्गालाही बसला आहे.
याआधी मंगळवार २६ जुलै २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई सीएसएमटी) येथे हार्बर मार्गावर लोकलचा डबा घसरून छोटा अपघात झाला. यामुळे गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांचे हाल झाले होते. या घटनेआधी सोमवारी २५ जुलै २०२२ रोजी रात्री उशिरा ऐरोली येथे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे काही मिनिटे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.