Mumbai Rain Forecast: काळजी घ्या, पुढील ४८ तास धोक्याचे

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 03, 2020 | 16:00 IST

Mumbai Rain News: सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोर धरला असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. 

Heavy rain in Mumbai
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा 

थोडं पण कामाचं

 • मुंबई आणि उपनगरांत जोरदार पाऊस 
 • अनेक ठिकाणी रस्त्यांवर साचले पाणी 
 • ठाणे, कल्याण डोंबिवलीतही पावसाचा जोर 

Mumbai, Thane Rain updates: राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला आणि राज्यातील विविध भागांतही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाऊस पडतच नव्हता. पण आता अखेर मुंबईसह (Mumbai City) उपनगरांत (Mumbai Suburb) पावसाने चांगलाच जोर धरल्याचं दिसत आहे. सकाळपासूनच मुंबई शहर, उपनगर, ठाणे (Thane) शहरात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं पहायला मिळत आहे. 

 1. मुंबईत सध्या पावसाचा जोर मंदावला असला तरी मुंबई आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात पुढील २४ ते ४८ तासासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 2. मुंबईत सकाळी ११.३० वाजेपर्यंत १५ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझमध्ये ६ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 3. जोरदार पावसामुळे किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यात आले आहे आणि आता रस्त्यावर आलेले सर्व पाणी ओसरले आहे.
 4. मुंबईतील हिंदमाता परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
 5. मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरातही रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरूवात झाल्याचे फोटोज एएनआय न्यूज एजन्सीने ट्वीट केले आहेत.
 6. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई (IMD Mumbai) केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर (K. S. Hosalikar) यांनी पावसाची स्थिती दर्शवणारे काही फोटोज ट्वीट केले आहेत. हे फोटोज ट्वीट करत त्यांनी म्हटलं, रडार आणइ उग्रह मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर पावसाची सक्रिय स्थिती दर्शवतात. आयएमडीने मुंबईला आणि किनारपट्टीवर पावसाचा इशारा पुढील २४/४८ तासांसाठी दिला आहे.
 7. ५ जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
 8. ६ जुलै: कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

मुंबई शहर आणि उपगनरात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी