कोरोनामुळे दिवसभरात मुंबईत शून्य मृत्यू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 18, 2021 | 00:39 IST

महामारीची सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच कोरोनामुळे दिवसभरात मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली. मुंबई महापालिकेच्या हद्दीत दिवसभरात ३६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

Mumbai records zero Covid-19 deaths in single day since beginning of pandemic
कोरोनामुळे दिवसभरात मुंबईत शून्य मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • कोरोनामुळे दिवसभरात मुंबईत शून्य मृत्यू
  • मुंबई महापालिकेच्या हद्दीत दिवसभरात ३६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
  • मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५९०२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः महामारीची सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच कोरोनामुळे दिवसभरात मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली. मुंबई महापालिकेच्या हद्दीत दिवसभरात ३६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महापालिकेच्या हद्दीत आतापर्यंत आढळलेल्या ७ लाख ५१ हजार ६५९ कोरोना रुग्णांपैकी ७ लाख २७ हजार ८४ जण बरे झाले. तसेच मुंबई महापालिकेच्या हद्दीत १६ हजार १८० जणांचा कोरोनामुळे तर २४९३ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. सध्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५९०२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी