No Bail To Aryan आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचाचा जामीन फेटाळला

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 20, 2021 | 16:29 IST

क्रूझवरील ड्रग पार्टीच्या केसमध्ये आरोपी असलेल्या आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा या तीन आरोपींचा जामीन अर्ज मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला. यामुळे न्यायालयीन कोठडीची मुदत संपेपर्यंत तिन्ही आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच असतील.

Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha
आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचाचा जामीन फेटाळला 
थोडं पण कामाचं
  • आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचाचा जामीन फेटाळला
  • न्यायालयीन कोठडीची मुदत संपेपर्यंत तिन्ही आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच असतील
  • आर्यन, अरबाझ, मुनमुनचे वकील मुंबईच्या उच्च न्यायालयात जामीन अर्ज करणार

मुंबईः क्रूझवरील ड्रग पार्टीच्या केसमध्ये आरोपी असलेल्या आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा या तीन आरोपींचा जामीन अर्ज मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला. यामुळे न्यायालयीन कोठडीची मुदत संपेपर्यंत तिन्ही आरोपी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच असतील. याआधी न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवून २० ऑक्टोबर रोजी जाहीर करू असे सांगितले होते. आज (बुधवार २० ऑक्टोबर २०२१) न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचे सांगितले. Mumbai’s Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha

जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे आर्यन, अरबाझ, मुनमुनचे वकील मुंबईच्या उच्च न्यायालयात जामीन अर्ज करणार आहेत. आर्यन, अरबाझ, मुनमुन या आरोपींना ८ ऑक्टोबरला आर्थर रोड जेलमध्ये आणण्यात आले, तेव्हापासून ते तिथेच आहेत. याआधी २ ऑक्टोबर रोजी आर्यन, अरबाझ, मुनमुन या आरोपींना एनसीबीने क्रूझवरील ड्रग पार्टीच्या केसमध्ये ताब्यात घेतले आणि ३ ऑक्टोबर रोजी अटक केले. 

न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी आर्यन, अरबाझ, मुनमुन या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. पण निकाल जाहीर होईपर्यंत उशीर झाला होता, त्यामुळे आरोपींना रात्रभर एनसीबीच्या कोठडीत ठेवून ८ ऑक्टोबर रोजी आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आले. 

आर्यनचे दोन वकील

ड्रग पार्टी केसमध्ये आर्यनचा बचाव सतिश मानेशिंदे आणि अमित देसाई करत आहेत. मागील काही सुनावण्यांच्या वेळी आर्यनची बाजू अमित देसाई यांनी मांडली.

आर्यनमुळेच सुरू आहे चर्चा

आर्यन खान हा बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आहे. यामुळेच ड्रग पार्टी केसची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. 

एनसीबीचे गंभीर आरोप

एनसीबीने आर्यनचे व्हॉट्सअॅप चॅट न्यायालयात सादर केले आहे. या चॅटमधील विशिष्ट शब्द आणि वाक्य यांच्याविषयी संशय व्यक्त करत एनसीबीने आर्यन खानवर ड्रग रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. 

ड्रग पार्टी प्रकरणाचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांशी आहे आणि या प्रकरणात पैसा आणि ओळखींचा वापर करुन साक्षी-पुराव्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यामुळे आरोपींना जामीन देऊ नये अशी भूमिका एनसीबी सातत्याने मांडत आहे. न्यायालयाने आरोपींचे जामीन अर्ज फेटाळल्यामुळे एनसीबीला तपासाकरिता आणखी वेळ उपलब्ध झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी