Mumbai School Reopen : मराठी माध्यमांची घंटा आज वाजली, मात्र इंग्रजी मीडियमची बेल होणार नाताळनंतर; भरणार पहिली ते सातवीचे वर्ग

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 15, 2021 | 08:28 IST

School Reopen : कोरोना (Corona) काळात बंद झालेल्या शाळा (School) आजपासून मोठ्या शहरात सुरू होत आहेत. मुंबईत (Mumbai) आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करा, असे निर्देश मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत

Mumbai School Reopen
मुंबईत आजपासून शाळा सुरू; पहिली ते सातवीचे वर्ग भरणार   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
 • मुंबई पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शाळा सुरु करण्याचे निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.
 • पुण्यातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत.
 • मुंबईतील प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं 30 नोव्हेंबरलाच घेतला होता.

School Reopen : मुंबई : कोरोना (Corona) काळात बंद झालेल्या शाळा (School) आजपासून मोठ्या शहरात सुरू होत आहेत. मुंबईत (Mumbai) आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करा, असे निर्देश मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. मुंबई पालिकेचे शिक्षणाधिकारी (Education Officer of Mumbai Municipal Corporation) राजू तडवी (Raju Tadvi) यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. ठाणे महापालिकेचाही आजपासून पहिली ते तवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नवी मुंबईतील शाळाही आजपासून सुरू होत आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. कॉन्व्हेंट, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ख्रिसमसनंतरचा मुहूर्त साधला आहे. तर पुण्यातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत.

दरम्यान पालकांमध्ये शाळा सुरू होणारविषयी संभ्रम निर्माण झाला होता.  शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आज 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं 30 नोव्हेंबरलाच घेतला होता. कोरोना प्रतिबंधक नियमावलीही त्यावेळी जाहीर करण्यात आली होती. मात्र शाळा सुरु होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचं वातावरण होतं. 

मुंबई महापालिकेच्या शाळा पूर्ण क्षमतेनं सुरू होणार

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या शाळांची संख्या 3 हजार 420 आहे. या शाळांमधील विद्यार्थी संख्या साडेदहा लाख इतकी आहे. महापालिकेने आजपासून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावेळी शाळा कोणत्याही स्थितीत सुरू केल्या जाणार असून यामध्ये तूर्तास कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.

"15 डिसेंबरपासून शाळा सुरु करा, हे याआधीच शाळांना सुचित केले होते. मात्र तरीदेखील काही शाळांनी आजतागायत पाल्याला शाळेत पाठविण्याविषयी पालकांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. ही बाब गंभीर असून पुन्हा नव्याने सूचना देण्यात येतील.", असं मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळा नाताळच्या सुट्टीनंतर

मुंबई महापालिकेने ओमिक्रॉन आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता 15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पालिकेच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. मात्र, दुसरीकडे कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा अद्यापही ऑनलाईन शिक्षणावर जोर आहे. इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळा नाताळच्या सुट्टीनंतर बोलवण्याचा शाळांचा विचार आहे.

नेमके नियम काय?

 • पालकांचं संमतीपत्र आवश्यक
 • ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार
 • एका बेंचवर एक विद्यार्थी
 • शाळा 3 ते 4 तास सुरु
 • गृहपाठावर भर
 • सांघिक खेळ खेळण्यास मनाई
 • शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक
 • सॅनिटायझेश, हात धुण्याची सोय आवश्यक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी