Mumbai School Reopening : मुंबईतील पालकांनो लक्ष द्या,  पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होणार नाहीत,

Mumbai School Reopening from 15 december : ओमिक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच शालेय शिक्षण विभागाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत मुंबईतील पहिली ते सातवीच्या शाळा आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Mumbai Schools for classes 1-7 will now reopen from December 15 instead of December 1
'ओमिक्रोन'ची भीती, शाळा सुरू होणार १५ डिसेंबरपासून   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • ओमिक्रोन (omicrome) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले
 • शालेय शिक्षण विभागाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत मुंबईतील पहिली ते सातवीच्या शाळा आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,
 • राज्यभरात डिसेंबरपासून पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी चाईल्ड टास्क फोर्स आणि आरोग्य विभागानेही हिरवा कंदील दिल्यानंतर शालेय शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यावर आपल्या निर्णयावर ठाम आहे.

Mumbai School Reopening  । मुंबई :  ओमिक्रोन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच शालेय शिक्षण विभागाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत मुंबईतील पहिली ते सातवीच्या शाळा आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रात पहिली ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. (Mumbai Schools for classes 1-7 will now reopen from December 15 instead of December 1)

राज्यभरात डिसेंबरपासून पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी चाईल्ड टास्क फोर्स आणि आरोग्य विभागानेही हिरवा कंदील दिल्यानंतर शालेय शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यावर आपल्या निर्णयावर ठाम आहे. कालच्या बैठकीत शाळांसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचा शासन निर्णयही जाहीर झाला आहे. यापूर्वी सोमवारी शालेय शिक्षण विभागाच्या  झालेल्या बैठकीत १ ली ते ४ थी शाळा १५ डिसेंबर पासून तर ५ वी ते ७ वी शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार होत्या. पण पालकांनी घेतलेल्या सावध पवित्र्यामुळे महापालिकेला निर्णय बदलावा लागला. 

मागील आठवडय़ात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरी भागात पहिली ते सातवी तर ग्रामीण भागात चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सार्वजनिक आरोग्य संचालनालयाने कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. कालच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत शहरी आणि ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती आणि शाळा सुरू करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. वर्ग भरविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची तयारी असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आणि आता शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासाठी एकच दिवस उरला असताना मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, आज महापालिकेने जाहीर केले की ओमिक्रोम व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता, मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिली ते सातवीचे वर्ग  १ डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. 

पालकांची सावध भूमिका

ओमिक्रोनच्या दहशतीमुळे पालक वर्गात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारपासून शाळा सुरू होणार असली तरी मुंबईतील काही पालकांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. मुंबईतील नव्या व्हेरिएंटमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्याचा विचार करू लागले आहेत. तर काही पालकांनी लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस आल्यावरच शाळेत पाठविण्याची भूमिका घेतली आहे.

मुंबईनंतर पुणे, नाशिकमध्ये १ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली. 

शिक्षण विभागाने काढलेल्या मार्गदर्शक सूचना

 1. थेट शिक्षणावर भर न देता मुलांना शाळेची सवय होऊ द्यावी.
 2. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणीच शाळा सुरू होणार.
 3. शिक्षक, शिक्षकेतरांचे 100 टक्के लसीकरण
 4. पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश नाही
 5. जास्त विद्यार्थी असल्यास दोन सत्रांत शाळा
 6. कोरोना रुग्ण आढळल्यास शाळा पूर्ण बंद
 7. इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करावी.
 8. विद्यार्थी, शिक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावा.
 9. शाळेच्या आवारात थुंकण्याला कडेकोट बंदी
 10. पालकसभा ऑनलाइन घ्याव्यात
 11. विद्यार्थ्यांवर उपस्थितीची सक्ती नाही, पालकांची संमती आवश्यक
 12. विद्यार्थ्यांनी स्वतःचेच शैक्षणिक साहित्य वापरावे.
 13. शाळेत वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करावी
 14. शाळेतून घरी गेल्यावर विद्यार्थ्यांला वैयक्तिक स्वच्छतेच्या सूचना द्याव्यात
 15. विद्यार्थी, शिक्षकांसाठी समुपदेशन
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी