Diwali : मुंबईत गेल्या 8 वर्षांत दिवाळीत सर्वाधिक प्रदूषण, हवेच्या गुणवत्तेने गाठला निचांकी स्तर

Mumbai Diwali Pollution : मंगळवारी दिवाळीनंतर मुंबईत सर्वाधिक प्रदूषण झाले आहे. गेल्या 8 वर्षांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक प्रदूषण झाले आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आणि सिस्टम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग रीसर्च या संस्थांनी याबद्दल माहिती दिली आहे.

diwali polluiton
दिवाळीतील प्रदूषण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मंगळवारी दिवाळीनंतर मुंबईत सर्वाधिक प्रदूषण झाले आहे.
  • गेल्या 8 वर्षांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक प्रदूषण झाले आहे.
  • मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हवेची गुणवता 305 इतकी होती. ही गुणवत्ता अतिशय वाईट श्रेणीत मोडते.

Mumbai Diwali Pollution : मुंबई : मंगळवारी दिवाळीनंतर मुंबईत सर्वाधिक प्रदूषण झाले आहे. गेल्या 8 वर्षांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक प्रदूषण झाले आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आणि सिस्टम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग रीसर्च या संस्थांनी याबद्दल माहिती दिली आहे. (mumbai see most polluted diwali in last 8 years safar reported)

अधिक वाचा : Fire: राज्यातील अनेक शहरात फटाक्यांनी लावली आग; पुण्यात 17 तर वसईत सहा ठिकाणी लागली आग

मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशातील प्रदूषणाबद्दल या दोन संस्थानी माहिती गोळा केली आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हवेची गुणवता 305 इतकी होती. ही गुणवत्ता अतिशय वाईट श्रेणीत मोडते. सुर्यास्ताच्या वेळी हवेची गुणवत्ता मुंबईत 320 वर होती आणि नंतर ती आणखी वाईट होत गेली. सोमवारी हवेची गुणवता 149 म्हणजेच मध्यम श्रेणीत होती. परंतु दिवाळीत नागरिकांनी फटाके फोडल्यानंतर हवेची श्रेणी बिघडत गेली. मुंबई आणि आजूबाजूच्या भागात 10 ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्र बसवण्यात आले होते. त्यावरून ही माहिती गोळा करण्यात आली होती. 

अधिक वाचा :  ‘बाय बाय’ मान्सून !, आता असं राहणार महाराष्ट्रातील हवामान

हवेची गुणवत्ता मोजताना 50 ते 500 एकक गणले जाते. त्यानुसार 100 ते 199 हवेची गुणवता ही मध्यम श्रेणी असते. तर 50 ते 99 ही श्रेणी समाधानी श्रेणी असते. 50 च्या खालील गुणवत्ता चांगली असते तर 200 च्या वरील हवेची गुणवत्ता ही वाईट, 300 च्या वर अतिशय वाईट तर 400 गंभीर आणि 500 च्यावर अतिशय गंभीर श्रेणी मानली जाते. प्रदूषण वाढल्यास नागरिकांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंदर्भात विकार जडतात तसेच त्यांचे धोकेही निर्माण होतात. 

अधिक वाचा : Aaditya Thackeray : नवीन पत्रासाठी या चर्चा सुरु असतील, आदित्य ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला

सफर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता ही 349 इतकी होती. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदा दोन्ही महानगरांत दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. यंदा दोन्ही शहरांत हवेची गुणवत्ता अतिशय वाईट श्रेणीत झाली आहे.  दिल्लीत दिवाळीत फोडलेल्या फटाक्यामुळे, शेतकर्‍यांनी गवत जाळल्यामुळे प्रदूषण होतं असे संस्थेने म्हटले आहे. 

अधिक वाचा : Navneet Rana : ऐन दिवाळीत खासदार नवनीत राणा तुरुंगात जाणार? कोर्टाकडून अटक करण्याचे वॉरंट जारी

2020 आणि 2021 या दोन वर्षी मुंबईत दिवाळीत पाऊस होता. म्हणून या दोन वर्षात हवेची गुणवत्ता चांगली होती. परंतु यावेळी दिवाळीपूर्वीच मान्सूनने मुंबईतून काढता पाय घेतला. तसेच राज्यात थंडीची लाट आली. आज बुधवारी हवेची गुणवत्ता खूप वाईट राहिल. परंतु आणि शनिवार रविवारपर्यंत हवेची गुणवत्ता सुधारेल आणि ती  मध्यम श्रेणीपर्यंत पोहोचेल असा अंदाज सफरने व्यक्त केला आहे. 

अधिक वाचा : Vadodara Riot: वडोदरात उसळली जातीय दंगल, रस्त्यावरील लाईट बंद करुन पोलिसांवर पेट्रोल बॉम्बचा हल्ला

2018 साली दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता 305 (अतिश वाईट श्रेणी) इतकी होती. तर 2017 साली हवेची गुणवत्ता 319 (अतिशय वाईट श्रेणी) इतकी होती. 2016 साली मुंबईत दिवाळीनंतरची हवेची गुणवत्ता 315 (अतिशय वाईट श्रेणी) आणि 2015 साली हवेची गुणवत्ता 313 (अतिशय वाईट श्रेणी) इतकी होती. 2019 साली मुंबईत सर्वाधिक स्वच्छ आणि प्रदूषणरहित दिवाळी साजरी झाली होती. त्यावेळी हवेची गुणवत्ता 75 म्हणजेच समाधानी श्रेणीत होती. 2019 साली मुंबईवर अरबी समुद्रात क्यार वादळाचे सावट होते आणि त्यामुळे मुंबईत मोठ्या वेगाने वारे वाहत होते. त्यानंतर 2020 सालीही मुंबई आणि आजूबाजूच्या भागात प्रदूषणरहित दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्या वर्षी कोरोनामुळे निर्बंध होते, त्यामुळेच दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता चांगली होती.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी