Mumbai मध्ये बंद पडलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत आढळले चौघांचे मृतदेह; मुंबईतील घटनेने खळबळ

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 01, 2022 | 17:24 IST

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून बंद पडलेल्या एका रुग्णालयाच्या इमारतीत चार मृतदेह आढळून आले आहेत. 

Mumbai shocker 4 dead bodies found inside abandoned hospital premises building crime news marathi
Mumbai मध्ये बंद पडलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत आढळले चौघांचे मृतदेह; मुंबईतील घटनेने खळबळ 
थोडं पण कामाचं
  • बंद पडलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत आढळले चौघांचे मृतदेह
  • मुंबईतील घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ
  • घटनास्थळावरुन सुसाईड नोटही जप्त

मुंबई : मुंबईतील कांदिवलीन (Kandivali Mumbai) परिसरात एका बंद पडलेल्या रुग्णालयाच्या इमारतीत चौघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे हे रुग्णालय गेल्या 15 वर्षांपासून बंद होते आणि त्याच रुग्णालयाच्या इमारतीत हे मृतदेह (4 dead bodies found in closed Hospital) आढळून आले आहेत. मृतकांमध्ये दोन मुली, त्या मुलींची आई आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मृतकांमध्ये 46 वर्षीय किरण दळवी, त्यांच्या मुली मुस्कान (26), भूमी (17) आणि परिवाराचा ड्रायव्हर शिवदयाल सेन (60) यांचा समावेश आहे. इंदूर येथील दळवी परिवाराचं हे रुग्णालय होतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते बंद आहे. या कुटुंबाचं एक घर रुग्णालयाच्या इमारतीतच होतं. किरण यांचे पती काही वर्षांपूर्वी इंदूर येथे निघून गेले होते. किरण यांची सासू राधाबाई यांच्या नावाने उभारण्यात आलेलं हे रुग्णालय 15 वर्षांपूर्वी बंद झालं होतं.

हे पण वाचा : "वयाच्या २३व्या वर्षी बलात्कार, लपून प्रेग्नंसी टेस्ट करायची तेव्हा...." महिला खासदाराने कथन केला धक्कादायक अनुभव

झोन 11 चे डीसीपी विशाल कुमार यांनी संशय व्यक्त केला आहे की, ड्रायव्हर असलेला शिवदयाल सेन हा गेल्या 10 वर्षांपासून त्या परिवारासोबत राहत होता. शिवदयाल यानेच किरण आणि मुस्कान यांची हत्या केली आणि त्यानंतर सेन आणि भूमी या दोघांनी मिळून आत्महत्या केली. भूमी हिनेच शिवदयाल सेन याच्यासोबत मिळून आपली आई आणि बहिणीची हत्या केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

घटनास्थळी सुसाईड नोट

कांदिवली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला कंट्रोल रूमला फोन आला की एक व्यक्ती या रुग्णालयात फिरत आहे. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा रुग्णालयाचा दरवाजा बंद होता त्यामुळे लॉक तोडला. किरण यांचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावर होता आणि मुस्कानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

दुसऱ्या जमल्यावरील किचनमध्ये मुस्कानचा मृतदेह आढळून आला. तर भूमी आणि शिवदयाल सेन यांचे मृतदेह पहिल्या मजल्यावरील एका बंद खोलीत आढळून आले. आम्हाला घटनास्थळावर चार सुसाईड नोट आढळून आल्या आहेत. यामध्ये कौटुंबिक मुद्द्यांमुळे हे पाऊल उचलल्यांचं म्हटलं असल्याची माहिती समोर येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी