मुंबई : भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरातील (Mumbai metropolis) नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभा, विधान परिषद आणि राज्य सरकारमध्ये (State Government) अनपेक्षित बदल घडवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता मुंबई महानगर प्रदेशकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेचे संपूर्ण वातानुकूलित (AC Rail) करण्याच्या २० हजार कोटींच्या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने (Prime Minister's Office) दिले असून त्यासाठी लवकरच केंद्रीय अर्थखात्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
लोकल प्रवास वातानुकूलित लोकल आणि रेल्वे मार्गाचे विस्तारीकरणावर लक्ष देण्यात येणार आहे. मुंबईसह ठाणे आणि अन्य महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने प्रकल्प लोकार्पणाचे नियोजन केले आहे. मुंबई महानगर प्रदेशात स्वस्त आणि जलद प्रवास केवळ लोकलने शक्य आहे. तिकीटदरांमध्ये निम्म्याने घट केल्यानंतर वातानुकूलित लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या लोकलमुळे दरवाज्यामधून लटकून होणारे अपघात बंद झाले आहेत. यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या माध्यमातून २३८ वातानुकूलित लोकल खरेदी करण्यात येणार आहेत. याचा लाभ मुंबईसह एमएमआरमधील सर्वच महापालिकेतील मतदार असलेल्या प्रवाशांना होणार आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे संपूर्ण वातानुकूलित करण्यासाठी निविदा कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी २० हजार कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहेत. प्रकल्प निविदेसाठी सर्व कागदपत्रे तयार आहेत. अर्थ खात्याकडून मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने निविदा मागवण्यात येतील, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.