Mumbai Suburban Railway: उपनगरीय रेल्वे पूर्वपदावर येण्यास सुरुवात, झाले 'हे' मोठे निर्णय

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 25, 2021 | 14:41 IST

Mumbai Suburban Railway: Reverting platform ticket to Rs 10 at CSMT, Dadar, LTT, Thane, Kalyan and Panvel stations कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यामुळे रेल्वेने ५० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा दहा रुपये केले

Mumbai Suburban Railway: Reverting platform ticket to Rs 10 at CSMT, Dadar, LTT, Thane, Kalyan and Panvel stations
Mumbai Suburban Railway:उपनगरीय रेल्वे पूर्वपदावर येण्यास सुरुवात, झाले 'हे' मोठे निर्णय 
थोडं पण कामाचं
  • उपनगरीय रेल्वे पूर्वपदावर येण्यास सुरुवात, झाले 'हे' मोठे निर्णय
  • कोरोना संकटाआधी जेवढ्या लोकल फेऱ्या सुरू होत्या तेवढ्याच फेऱ्या आता सुरू झाल्या
  • रेल्वेने प्रवासाला पात्र असलेल्यांना यूटीएस अॅपद्वारे ऑनलाइन तिकीट आणि पास खरेदीचा पर्याय उपलब्ध

Mumbai Suburban Railway: Reverting platform ticket to Rs 10 at CSMT, Dadar, LTT, Thane, Kalyan and Panvel stations मुंबई: महाराष्ट्रात कोरोना संकट नियंत्रणात येत असल्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेची व्यवस्था कोरोना आधीच्या स्थितीप्रमाणेच कार्यरत होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात स्टेशनवर कमी गर्दी व्हावी यासाठी मुद्दाम महत्त्वाच्या स्टेशनचे प्लॅटफॉर्म तिकीट दहा रुपयांवरुन वाढवून थेट ५० रुपये केले होते. कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यामुळे रेल्वेने ५० रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा दहा रुपये केले आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल या स्टेशनवर ५० ऐवजी १० रुपयांतच प्लॅटफॉर्म तिकीट मिळेल.

पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे मुख्य मार्ग, मध्य रेल्वे हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वे ट्रान्स हार्बर मार्ग या मार्गांवर कोरोना संकटाआधी जेवढ्या लोकल फेऱ्या सुरू होत्या तेवढ्याच फेऱ्या आता सुरू झाल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसचा दुसरा डोस घेऊन किमान चौदा दिवस झालेल्यांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन योग्य तिकीट अथवा पाससह रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी युनिव्हर्सल पास ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केले आहेत. तसेच रेल्वेने प्रवासाला पात्र असलेल्यांना यूटीएस अॅपद्वारे ऑनलाइन तिकीट आणि पास खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी