Mumbai Taxi Fare : मुंबईकरांना लोकल ट्रेन वाटेल भारी; मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला

मुंबई
भरत जाधव
Updated Sep 24, 2022 | 07:03 IST

मुंबई शहरात प्रवास करताना तुम्ही रिक्षा-टॅक्सीचा वापर करणार असाल तर तुम्हाला तुमच्या खिश्यात असलेल्या पैशाचा विचार करावा लागले.  कारण पुण्यात रिक्षाचा प्रवास महागल्यानंतर आता राज्याची राजधानी मुंबईतही (Mumbai)  रिक्षा, टॅक्सीचा (Taxi Fare Hike)  प्रवास महागणार आहे. मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

Rickshaw and taxi travel in Mumbai is expensive
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे.
  • सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहचला आहे
  • रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात साधरण दोन ते तीन रुपयांच्या वाढ

मुंबई :  मुंबई शहरात प्रवास करताना तुम्ही रिक्षा-टॅक्सीचा वापर करणार असाल तर तुम्हाला तुमच्या खिश्यात असलेल्या पैशाचा विचार करावा लागले.  कारण पुण्यात रिक्षाचा प्रवास महागल्यानंतर आता राज्याची राजधानी मुंबईतही (Mumbai)  रिक्षा, टॅक्सीचा (Taxi Fare Hike)  प्रवास महागणार आहे. मुंबईत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. मुंबईत रिक्षाची दोन रुपयांनी तर टॅक्सीची तीन रुपयांनी भाडेवाढ होणार आहे. या निर्णयावर सोमवारी (२६ सप्टेंबर)  शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून मुंबईत रिक्षा,टॅक्सीचा प्रवास महागणार आहे.  (Mumbai Taxi Fare: Rickshaw and taxi travel in Mumbai is expensive)

मागील काही महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ होत आहे.   सीएनजी प्रतिकिलोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना, रिक्षा-टॅक्सीचे किमान भाडे वाढले नव्हते. राज्य सरकारने अर्थसंकल्पात सीएनजी गॅसच्या दरात कपात केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने सीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ केली. सध्या सीएनजी गॅसचा दर 80 रुपयांच्या घरात पोहचला आहे. राज्यातील बहुतांशी रिक्षा-टॅक्सी या सीएनजी गॅसवर आधारीत आहेत. त्यामुळे या दरवाढीचा फटका रिक्षा-टॅक्सी चालकांना बसत होता. यामुळे ऐन नवरात्रोत्सवात रिक्षा-टॅक्सी संघटनेने शहर आणि उपनगरांत संपाची हाक दिली होती.

Read Also : Nude video call : महिलेने हैदराबादच्या तरुणाला अडकवले

सरकारकडून भाडेवाढ करण्याबाबत निर्णय न घेतल्यास रिक्षा-टॅक्सी चालकांनी 26 तारखेला संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी सरकारकडून आज तातडीची बैठक घेतली. रिक्षा-टॅक्सी संघटनेला चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात साधरण दोन ते तीन रुपयांच्या वाढ केली जावी अशी मागणी करण्यात आली, ही  मागणी उदय सामंत यांनी मान्य केली. याचमुळे  सोमवारपासून घोषित केलेला संप मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस एल. क्वाड्रोस यांनी दिली.

किती वाढणार भाडे 

आधीच महागाई, त्यात भाडेवाढीने अधिक मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे. खटूआ समितीने दिलेल्या अहवालानुसार, इंधनदर वाढ झाल्यास किमान भाडे वाढवण्याची शिफारस आहे. सरकारने खटूआ समितीच्या शिफारसी स्वीकारल्या आहेत. यामुळे रिक्षा आणि टॅक्सी दरात अनुक्रमे दोन आणि तीन रुपये वाढ करावी. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी करावी. भाडेवाढ करण्याबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही', अशी भूमिका संघटनेने ठामपणे मांडली. यानंतर उदय सामंत यांनी भाडेवाढीस सहमती दर्शवली.  

Read Also : मुलांच्या डाएटमध्ये 'या' गोष्टींचा समावेश करा

भाडेवाढ झाल्यास प्रवाशांना रिक्षासाठी २३ रुपये आणि टॅक्सीसाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या रिक्षाचे किमान भाडे २१ रुपये असून, टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये आहे. आधीच महागाईने मध्यमवर्गीय कुटुंबीयांचे आर्थिक गणित बिघडले असताना, त्यांना आता हा दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. दरम्यान , भाडेवाढीवर निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला (एमएमआरटीए) आहे. प्राधिकरणाची बैठक सोमवारी पार पडणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी