Winter in Mumbai : मुंबईकर आणखी गारठणार, तापमान आणखी घटणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Winter in Mumbai मुंबईत गेल्या दिवसांपासून थंडी पडली आहे. मुंबईकरांनी कपाटात पडलेल्या गरम कपडे अंगावर चढवले आहेत. मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे, असे असले तरी मुंबईत अजून थंडी पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.

थोडं पण कामाचं
  • मुंबईत गेल्या दिवसांपासून थंडी पडली आहे.
  • मुंबईत अजून थंडी पडण्याची शक्यता आहे.
  • हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.

Winter in Mumbai : मुंबई : मुंबईत गेल्या दिवसांपासून थंडी पडली आहे. मुंबईकरांनी कपाटात पडलेल्या गरम कपडे अंगावर चढवले आहेत. मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे, असे असले तरी मुंबईत अजून थंडी पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. (mumbai temperature will drop imd predict winter) 

सोमवारी मुंबईत १३.२ सेल्सियश अंश तापमान नोंदवले गेले होते. शनिवारी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, त्यानंतर मुंबईत आणखी पारा घसरला. जानेवारी महिन्यातील हे सर्वात नीच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये मुंबईत सर्वाधिक कमी म्हणजेच १०.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. 

२०२० मध्ये ११.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले होते. जानेवारीच्या पहिल्या १०-१२ दिवसांतच मुंबईत सर्वात कमी तापमान नोंदवले गेले आहे, अजून संपूर्ण महिना बाकी असून हे तापमान आणखी खाली जाईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईत दिवसेंदिवस थंडी वाढणार आहे, फक्त किमानच नव्हे तर कमाल तापमानही कमी झाले आहे. 

 

सातार्‍यातही पार घसरला
 

मुंबईच नाही तर सातारा आणि महाबळेश्वरमधीलही तापमान घसरले आहे. महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढत चालला असून प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात तर थंडी अधिकच जाणवत आहे. आज सकाळी पहाटे सहा वाजता वेण्णा लेकवर पारा घसरून सहा अंशावर आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक दिवसभर उबदार गरम कपडे,शाली, स्वेटर्स घालून फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवून त्याभोवती नागरिक शेकत बसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध वेण्णा लेकवर जणू धुक्याची चादरच पसरल्याचे दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी