Mumbai Local : Mumbai Local : दादरला सिग्नल यंत्रणा बिघडली, लोकलची रेल्वे वाहतूक उशीरा, मध्य रेल्वेने केले प्रवाशांना हे आवाहन

Mumbai Local : दादरमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने धावत आहे. सकाळी सकाळी कामासाठी निघणार्‍या चाकरमान्यांचे यामुळे चांगलेच हाल झाले आहे. ठाण्याहून सीएसएमटीसाठी सुटणार्‍या गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत. दादर ते सीएसमटी दरम्यान गाड्यांच्या रांगा लागल्या असून मध्य रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी युद्धपातळीवर सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम करत आहेत.

Breaking News
Mumbai Local : दादरला सिग्नल यंत्रणा बिघडली, लोकलची रेल्वे वाहतूक उशीरा 
थोडं पण कामाचं
  • दादरमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने धावत आहे.
  • सकाळी सकाळी कामासाठी निघणार्‍या चाकरमान्यांचे यामुळे चांगलेच हाल झाले आहे.
  • या बिघाडामुळे माटुंगा, दादर ते परळ दरम्यान लोकलच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

Mumbai Local : मुंबई : दादरमध्ये सिग्नल यंत्रणा बिघडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने धावत आहे. सकाळी सकाळी कामासाठी निघणार्‍या चाकरमान्यांचे यामुळे चांगलेच हाल झाले आहे. ठाण्याहून  सीएसएमटीसाठी सुटणार्‍या गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत. दादर ते सीएसमटी दरम्यान गाड्यांच्या रांगा लागल्या असून मध्य रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी युद्धपातळीवर सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम करत आहेत. 

गेल्या तासाभरापासून मध्य रेल्वेवर बिघाड झाला आहे. मध्य रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवर हा बिघाड झाला असून दादर माटुंगा दरम्यान हा बिघाड झाल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे. या बिघाडामुळे माटुंगा, दादर ते परळ दरम्यान लोकलच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. गाड्या खोळंबल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळांमधून चालण्यास सुरूवात केली आहे. 


दादरच्या सिग्नल केबीनमध्ये तांत्रिक बिघाड

दादरचा सिग्नल केबीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. या तांत्रिक बिघाडामुळे  मध्य रेल्वेच्या कल्याण, ठाणे आणि दादर मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. मध्य रेल्वेची ही वाहतूक उशीराने धावत आहे. असे असले तरी प्रवाशांनी रुळांवरून चालत जाऊ नये असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी