Mumbai Theft of gold: चोरी ठरली फायद्याची; 22 वर्षापूर्वी चोरीला गेलं 13 लाखांचं सोनं, पोलिसांनी परत देताच झालं करोडो रुपयांचं

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 30, 2022 | 14:22 IST

Theft Gold Recover After 22 Year: म्हणतात ना 'जो भी होता है, वह अच्छे के लिए होता है। गीता सारमधील वाक्य आपण कुठे ना कुठे पाहिलं असेल. किंवा बहुतेक वेळा आपण म्हणतही असतो. या गीता सारची प्रचिती मुंबईतील (Mumbai ) कुलाब्यात (Colaba) राहणाऱ्या एका व्यापाऱयाला (Merchant) आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) तब्बल २२ वर्षांनंतर या व्यापाऱ्यांचं वडिलोपार्जित सोने (Ancestral gold) परत केलं,

Mumbai Theft of gold
चोरीला गेलं 13 लाखांचं सोनं, पोलिसांनी परत केलं करोडोंचे (File Photo)  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वडिलोपार्जित सोने 22 वर्षांनंतर महाराष्ट्र पोलिसांकडून परत मिळाले आहे.
  • 6 एप्रिल 1998 रोजी सकाळी 8 वाजता चार हल्लेखोरांनी चाकुचा धाक दाखवत कुटुंबाला ओलीस ठेवले होतं.
  • अहवालानुसार, त्यावेळी दागिन्यांची किंमत १३ लाख ४५ हजार रुपये होती, जी आज दीड कोटींहून अधिक झाली आहे.

Mumbai Theft of gold: मुंबई : म्हणतात ना 'जो भी होता है, वह अच्छे के लिए होता है। गीता सारमधील वाक्य आपण कुठे ना कुठे पाहिलं असेल. किंवा बहुतेक वेळा आपण म्हणतही असतो. या गीता सारची प्रचिती मुंबईतील (Mumbai ) कुलाब्यात (Colaba) राहणाऱ्या एका व्यापाऱयाला (Merchant) आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) तब्बल २२ वर्षांनंतर या व्यापाऱ्यांचं वडिलोपार्जित सोने (Ancestral gold) परत केलं, या घटनेने कुटुंबीयांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि कुटुंब भावूक झाले. इतकंच नाही तर सोन्याला करोड्या रुपयांची किंमत देखील आली आहे. गोंधळलात ना, मुळीच गोंधळू नका हा नेमका काय प्रकार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.. 

स्थानिक कुलाबा येथे राहणाऱ्या एका व्यापारी कुटुंबाला चोरीला गेलेलं वडिलोपार्जित सोने 22 वर्षांनंतर महाराष्ट्र पोलिसांकडून परत मिळाले आहे.
 या घटनेने कुटुंबीयांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि कुटुंब भावूक झाले. येथे राहणाऱ्या अर्जुन दासवानी यांच्या घरात 6 एप्रिल 1998 रोजी सकाळी 8 वाजता चार हल्लेखोरांनी चाकुचा धाक दाखवत कुटुंबाला ओलीस ठेवले होते. चोरट्यांनी येथून दोन नाणी, एक सोन्याचे ब्रेसलेट आणि इतर दागिने लुटले. या घटनेवरून महाराष्ट्र पोलिसांनी कलम ३४२, ३९४, ३९७, ४५२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 

या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना कुलाबा विभागाचे एसीपी पांडुरंग शिंदे यांनी सांगितले की, दासवानी, त्यांची पत्नी, मुले आणि नोकर सकाळी उपस्थित होते. चोरट्यांनी घराची बेल वाजवली आणि दरवाजा उघडताच घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सदस्यांचे हात पाय बांधले आणि दासवानी यांना मारहाण केली. 
त्यांनी घराच्या लॉकरची चावी मागितली. कुटुंबीयांची सुरक्षितता पाहून दासवानी यांनी लॉकरची चावी चोरट्यांना दिली. चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यात दोन मौल्यवान नाणीही होती. त्यात एका बाजूला राणी व्हिक्टोरिया आणि दुसऱ्या बाजूला राणी एलिझाबेथची आकृती होती. 

22 वर्षांपूर्वी याची किंमत होती फक्त 13 लाख रुपये 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अहवालानुसार, त्यावेळी दागिन्यांची किंमत १३ लाख ४५ हजार रुपये होती, जी आज दीड कोटींहून अधिक झाली आहे. राणी व्हिक्टोरिया आणि क्वीन एलिझाबेथच्या आकारातील एका नाण्याचे वारसा मूल्य (हेरिटेज वैल्यू ) अंदाज करणे कठीण आहे. एसीपी पांडुरंग शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणात एकूण नऊ आरोपी होते, त्यापैकी एकही पोलिसांना आजतागायत सापडलेला नाही. यातील तीन आरोपी निर्दोष आढळले. तर एक आरोपी न सापडल्याने बदमाशांकडून जप्त केलेले सोन्याचे दागिने पोलिसांकडे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. 

ट्रायल पूर्ण होईपर्यंत जप्त केलेला माल दिला जात नाही

एसीपी पांडुरंग शिंदे म्हणाले की, जप्त केलेला माल खटला पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावा, असा न्यायालयाचा आदेश होता, त्यामुळे तो मालकाला देण्यात आलेला नाही.  परंतु अशा प्रकरणांमध्ये जप्त केलेले सोने-चांदीचे सामान त्यांच्या मालकांना परत करण्याचे आदेश मुंबई आयुक्तांनी दिले. यानंतर दासवानी यांच्या मुलाने न्यायालयात अर्ज केला आणि सांगितले की, 2007 मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून सोन्याचे दागिने त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी