मुंबई ते रायगड अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार, वाचा कसा आहे देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प

Mumbai Trans Harbour Link project details: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले असून देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे.

Mumbai Trans Harbour Link open in november longest OSD span of 180 meters Sewri Mumbai to Chirle Raigad in 20 minutes
मुंबई ते रायगड अवघ्या 20 मिनिटांत गाठता येणार, वाचा कसा आहे देशातील सर्वात लांबीचा सागरी मार्ग असलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण
  • देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग
  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी मार्गिका असलेला पूल 

Mumbai to Navi Mumbai in 20 Minutes: मुंबईहून रायगडमध्ये जाण्याचा मार्ग आणखी सुकर होणार आहे. कारण, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे (mumbai trans harbour link project) काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. 2023 या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात हा सागरी मार्ग प्रवासासाठी खुला करण्यात येणार आहे. हा सागरी मार्ग सुरू होताच मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग नेमका आहे तरी कसा जाणून घ्या.... (Mumbai Trans Harbour Link open in november longest OSD span of 180 meters Sewri Mumbai to Chirle Raigad in 20 minutes)

देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग 

देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज 2 मधील पहिला सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच सुमारे 180 मीटर लांबीचा आणि सुमारे 2300 मेट्रिक टन वजनाचा ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली.

Sea Links to ease Mumbai roads : नरिमन पॉइंट ते विरार एका तासात, 5 सी लिंकमुळे प्रवास होणार सुपरफास्ट

हे पण वाचा : अलिबागच्या आसपास फिरण्यासारखी प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाणे

ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग

मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले असून या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसणार आहे. ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे पण वाचा : काळ्या तांदळाचे उपाय करतील तुम्हाला मालामाल

22 किमी लांबीच्या 6 पदरी मार्गिका असलेला पूल

संपूर्ण प्रकल्पांतर्गत समुद्रात उभरण्यात येणाऱ्या एकूण 70 ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेक (Orthotropic Steel Deck) स्पॅन पैकी एकूण 36 स्पॅनचीउभारणी पूर्ण झाली आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई ट्रांस हर्बर लिंक (MTHL) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू असून प्रकल्पाची स्थापत्य कामे सुमारे 90 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3+3 मार्गिका) पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे.

हे पण वाचा : शिळ्या चपाती, भाकरीपासून बनवा हे स्वादिष्ट पदार्थ

नेव्हिगेशनल स्पॅनची उभारणी

मुख्य पुलाची रचना ही 60 मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे. ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असे म्हणतात. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे  स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे 25 मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पॅकेज 2 मधील एकूण 32 ओएसडी स्पॅनपैकी 15 ओएसडी स्पॅन आधीच स्थापित केले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 180 मीटरचा हा पॅकेज 2 मधील सर्वात लांब ओएसडी स्पॅन स्थापित करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी