Mumbai : मुंबईत धक्कादायक घटना, हॉटेलच्या इमारतीतून सीमेंटचा दगड डोक्यावर पडल्यामुळे 2 ठार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Feb 15, 2023 | 05:25 IST

Mumbai : Two pedestrians killed as cement block falls on them at construction site in Worli : मुंबईत वरळीच्या गांधीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली.

Mumbai : Two pedestrians killed as cement block falls on them at construction site in Worli
मुंबईत धक्कादायक घटना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत धक्कादायक घटना
  • हॉटेलच्या इमारतीतून सीमेंटचा दगड डोक्यावर पडल्यामुळे 2 ठार
  • वरळी पोलीस ठाण्याने घटनेची नोंद करून तपास सुरू केला

Mumbai : Two pedestrians killed as cement block falls on them at construction site in Worli : मुंबईत वरळीच्या गांधीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. फोर सीझन रेसिडन्सी (Four Season Residency) नावाच्या हॉटेलचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. हॉटेलच्या इमारतीच्या 42व्या मजल्यावरून सीमेंटचा ब्लॉक अर्थात सीमेंटचा दगड खाली पडला. हा सीमेंटचा दगड रस्त्यावरून जात असलेल्या 2 जणांच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.

SSC HSC Exam : बोर्डाचं कॉपीमुक्त अभियान, दहावी बारावी परीक्षेच्या केंद्राजवळील झेरॉक्स दुकानं ठेवणार बंद

इमारतीचे बांधकाम सुरू असूनही आसपासच्या भागात सुरक्षेचे उपाय करण्यात आले नव्हते. यामुळे इमारतीतून पडलेला सीमेंटचा ब्लॉक थेट नागरिकांच्या डोक्यावर पडला. धक्कादायक बाब म्हणजे सीमेंटचा ब्लॉक डोक्यावर पडून 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती इमारतीत कोणाकडेच नव्हती. जखमी झालेले 2 जण अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून होते. या कालावधीत दोघांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. जेव्हा दुर्घटना झाल्याचे कळले तेव्हा 108 वर कॉल करून अँब्युलन्स बोलावण्यात आली आणि जखमींना नायर  हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळली होती. डॉक्टरांनी तपासणी करून दोघांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. 

Pune-Nashik highway Accident :पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव कारने महिलांना चिरडलं; 5 जागीच ठार, 13 जणींवर उपचार सुरू

इमारतीचे बांधकाम करत असलेल्यांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे दोघांना नाहक प्राण गमवावा लागल्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्याने घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी