पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टची सवलत योजना

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 20, 2022 | 08:00 IST

Mumbai : undergraduate & postgraduate students can travel in BEST buses on concessional fares : शाळेत शिकत असलेल्यांपासून ते पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्यांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बेस्टने आकर्षक सवलतीच्या पासची योजना जाहीर केली

Mumbai : undergraduate & postgraduate students can travel in BEST buses on concessional fares
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टची सवलत योजना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बेस्टची सवलत योजना
  • शाळेत शिकत असलेल्यांपासून ते पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्यांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या पासची योजना
  • पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्यांसाठी सवलतीचे पास सोमवार २२ ऑगस्ट २०२२ पासून मिळणार

Mumbai : undergraduate & postgraduate students can travel in BEST buses on concessional fares : मुंबई : शाळेत शिकत असलेल्यांपासून ते पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्यांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बेस्टने आकर्षक सवलतीच्या पासची योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्यांसाठी सवलत योजना लागू होईल असे जाहीर केल्यानंतर बेस्ट प्रशासनाने ही घोषणा केली. 

मुख्यमंत्री झाल्यासारखं अजून वाटत नाही - एकनाथ शिंदे

बेस्टच्या नव्या घोषणेनुसार ज्यांना आधीपासूनच सवलत मिळत आहे त्यांची सवलत योजना सुरू राहणार आहे. तसेच पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही सवलतीच्या पासची योजना सुरू होणार आहे. आधी शाळेत शिकत असलेल्यांपासून ते बारावीत (ज्युनिअर कॉलेज) शिकत असलेल्यांपर्यंतच विद्यार्थ्यांची सवलतीच्या पासची योजना लागू होती. आता पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही सवलतीच्या पासची योजना लागू होईल.

पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सोमवार २२ ऑगस्ट २०२२ पासून सवलतीच्या योजनेचे पास उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना सवलतीच्या पासमुळे बेस्ट बसचा १०० फेऱ्यांसाठीचा मासिक पास ९९९ ऐवजी ५०० रुपयांत मिळणार. तीन महिन्यांचा पास (तिमाही पास) १५०० रुपयांत तर सहा महिन्यांचा पास (सहामाही पास) २५०० रुपयांत मिळणार आहे.

शाळेत शिकत असलेल्या पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बेस्टचा मासिक पास २०० रुपयांत, तीन महिन्यांचा पास ६०० रुपयांत आणि सहा महिन्यांचा पास एक हजार रुपयांत मिळणार आहे. तसेच शाळेत शिकत असलेल्या सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बेस्टचा मासिक पास २५० रुपयांत, तीन महिन्यांचा पास ७५० रुपयांत आणि सहा महिन्यांचा पास १२५० रुपयांत मिळणार आहे. 

ज्युनिअर कॉलेजमध्ये (अकरावी आणि बारावीचे वर्ग) शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बेस्टचा मासिक पास ३५० रुपयांत, तीन महिन्यांचा पास १०५० रुपयांत आणि सहा महिन्यांचा पास १७५० रुपयांत मिळणार आहे.

बेस्टची एसी डब डेकर बस सेवा सुरू झाली. या सेवेचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्यांसाठीही सवलतीच्या पासची योजना लागू करणार असल्याचे जाहीर केले. यानंतर बेस्टची विद्यार्थ्यांसाठीच्या सवलतीच्या पासची नवी योजना जाहीर केली. या योजनेनुसार शाळेत शिकत असलेल्यांपासून ते पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्यांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या पासची योजना लागू होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी