BMS Sem V and B.Com A & F Sem V result declare by Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या अंतिम वर्षाच्या डिसेंबर 2022 मध्ये संपन्न झालेल्या हिवाळी सत्राच्या वाणिज्य शाखेचे बीएमएस सेमिस्टर 5 आणि बीकॉम अकाऊंट व फायनान्स सेमिस्टर 5 परीक्षेचे निकाल जाहीर केले.
बीएमएस सेमिस्टर 5 च्या परीक्षेमध्ये एकूण 10 हजार 601 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 15 हजार 457 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 हजार 351 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर विद्यार्थी परीक्षेला 106 अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 4482 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीएमएस सेमिस्टर 5 चा निकाल 70.28 टक्के लागला आहे.
बीकॉम अकाऊंट व फायनान्स सेमिस्टर 5 च्या परीक्षेमध्ये एकूण 5 हजार 828 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 9 हजार 302 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9 हजार 234 एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर 68 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत 3366 विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. बीकॉम अकाऊंट व फायनान्स सेमिस्टर 5 चा निकाल 63.39 टक्के लागला आहे.
या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाने आजपर्यंत 2022 च्या हिवाळी सत्राचे 104 निकाल जाहीर केले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.