मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्र 2023 च्या विद्यापीठ स्तरावरील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सदर परीक्षांच्या तारखांना नुकत्याच झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्यापीठ उन्हाळी सत्राच्या 431 परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उन्हाळी सत्राच्या या परीक्षा 27 मार्च 2023 पासून सुरु होत आहेत.
यातील 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6 ची परीक्षा 5 एप्रिल तर तृतीय वर्ष बीए व बीएस्सी सत्र 5 च्या परीक्षा 12 एप्रिल आणि बीएमएस सत्र 6 ही परीक्षा 25 एप्रिलपासून सुरु होत आहेत.
विद्यापीठ दरवर्षी चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेत असते. विद्यापीठाने 2023 च्या उन्हाळी सत्राच्या मानव्यविद्याशाखेच्या एकूण 85 परीक्षा, वाणिज्य विद्याशाखेच्या 97 परीक्षा, विज्ञान विद्याशाखेच्या 116 परीक्षा तर आंतर विद्याशाखेच्या 133 अशा 431 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तंत्रज्ञान विद्याशाखेच्या परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. सर्व विद्याशाखेच्या सर्व परीक्षेच्या तारखेचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपपलब्ध आहे. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात करण्यात येईल.
हे पण वाचा : हे 2 पदार्थ वापरा अन् मासिक पाळीच्या वेदना पळवा
परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे व त्यांच्या विभागाने या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले असून ते तयार करताना त्या त्या विद्याशाखांचे 90 दिवसांचे सत्र, सुट्ट्या व इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे.
हे पण वाचा : तुम्हीही सकाळी ब्रश न करता खाता? वाचा काय आहेत त्याचे तोटे
परीक्षा | परीक्षेची तारीख |
बी. कॉम सत्र 6 | 5 एप्रिल 2023 |
बी. ए. सत्र 6 | 12 एप्रिल 2023 |
बी. एससी सत्र 6, बी. एससी सत्र 6 (संगणकशास्त्र), बी. एससी सत्र 6 (बायोटेक) | 12 एप्रिल 2023 |
बीएमएस सत्र 6 | 25 एप्रिल 2023 |
सत्र 6 च्या परीक्षा बी. कॉम (बँकिंग व इन्शुरन्स), बी. कॉम (अकाऊंटींग आणि फायनान्स), बी. कॉम (फायनान्शियल मॅनेजमेंट), बी. कॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बी. कॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट) | 25 एप्रिल 2023 |
बीए मल्टिमीडिया अँड मास कम्युनिकेशन सत्र 6 | 12 एप्रिल 2023 |
बी. एस्सी. आयटी सत्र 6 | 12 एप्रिल 2023 |
मुंबई विद्यापीठाचे डॉ. प्रसाद कारंडे प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी सांगितले की, उन्हाळी सत्राच्या परीक्षा महत्त्वाच्या असल्याने परीक्षा घेणे, मुल्यांकन आणि निकाल वेळेवर जाहिर करणे याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.