Mumbai University Exam postponed: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई
सुनिल देसले
Updated Oct 04, 2022 | 16:31 IST

Mumbai university exam: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

Mumbai university winter session exams postponed read details in marathi
Mumbai University Exam postponed: मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या 
थोडं पण कामाचं
  • मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
  • मुंबई विद्यापीठातील हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्या
  • 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार होत्या परीक्षा

Mumbai university exams postponed: मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्रात घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र म्हणजेच हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाने या संदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. (Mumbai university winter session exams postponed read details in marathi)

मुंबई विद्यापीठाच्या 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा 10 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार होत्या. आता त्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असंही मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा : Silky केसांसाठी वापरा Coffee हेअर मास्क

विद्यापीठाकडे  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी केली होती. या मागणीवर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून 2022 च्या हिवाळी सत्राच्या सत्र 5 बरोबरच सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हे पण वाचा : 'या' सवयी तुम्हाला अगदी असंच बनवेल!

मुंबई विद्यापीठ 2022 च्या हिवाळी सत्रामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव्य विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि आंतरशाखीय विद्याशाखा अशा चार विद्याशाखेच्या 450 पेक्षा जास्त परीक्षा घेणार आहे.

हे पण वाचा : फिट राहण्यासाठी सूर्यकुमारचा असा आहे डाएट प्लान

या संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले की, "2022 च्या हिवाळी सत्राच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन आहे. सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी