मुंबईत महिला वकिलाचा पाठलाग करणाऱ्या नीरज मियांला अटक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 12, 2022 | 08:14 IST

मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या महिला वकिलाचा पाठलाग करणाऱ्या नीरज मियां (३३) नावाच्या वेटरला पोलिसांनी अटक केली. नीरज मियां मुंबईतील एका हॉटेलध्ये वेटरची नोकरी करतो.

Mumbai: Waiter stalks lawyer in train, held
मुंबईत महिला वकिलाचा पाठलाग करणाऱ्या नीरज मियांला अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुंबईत महिला वकिलाचा पाठलाग करणाऱ्या नीरज मियांला अटक
  • रेल्वे पोलिसांची कारवाई
  • आरोपी विरोधात पाठलाग करणे, छेड काढणे अशा स्वरुपाचे आरोप ठेवून कायद्यानुसार कारवाई करणार

मुंबई : मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या महिला वकिलाचा पाठलाग करणाऱ्या नीरज मियां (३३) नावाच्या वेटरला पोलिसांनी अटक केली. नीरज मियां मुंबईतील एका हॉटेलध्ये वेटरची नोकरी करतो.

महिला वकील रेल्वेतून प्रवास करत असताना वेटर असलेल्या नीरज मियां याने सांताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान तिचा पाठलाग केला. याआधी सांताक्रुझ येथे ट्रेनमध्ये बसण्याआधी नीरज मियां याने संबंधित महिला वकिलाला धक्का दिला होता. पण त्यावेळी ट्रेन पकडण्याच्या गडबडीत धक्का लागला असे समजून महिला वकिलाने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर महिला वकील चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्य ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात जाऊन बसली. तर नीरज मियां या महिला डब्याशेजारच्या डब्यात जाऊन बसला. प्रत्येक स्टेशनवर तो उतरून संबंधित महिला ट्रेनमध्येच आहे याची खात्री महिलांच्या डब्याच्या एका खिडकीजवळ येत होता. महिला वकील ट्रेनमध्ये असल्याचे लक्षात येताच पुन्हा ट्रेनमध्ये बसत होता. हा प्रकार महिला वकिलाच्या लक्षात आला. अखेर तिने रेल्वेच्या पोलिसांना माहिती दिली. महिला वकील चर्चगेट स्टेशनवर उतरताच नीरज मियां याने तिथून पुढे पुन्हा एकदा पाठलाग सुरू केला. पण रेल्वेच्या पोलिसांनी लगेच नीरज मियां याला ताब्यात घेतले. नीरज मियां याच्या विरोधात पाठलाग करणे, छेड काढणे अशा स्वरुपाचे आरोप ठेवून कायद्यानुसार कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी