Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद

No water supply for Saturday: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, पुढील 9 शनिवार काही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

Mumbai water cuts every Saturday for at Khairani area read details in marathi
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागात दर शनिवारी पाणीपुरवठा बंद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या शनिवारसह पुढचे 9 शनिवार पाणीपुरवठा बंद नागरिकांना पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन
  • खबरदारीची उपाययोजना म्हणून दर रविवारी पाणी उकळून घेण्याचे आवाहन

Water cut every Saturday in Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या पूर्व उपनगरातील 'एल' विभागामधील खैरानी रोडखाली असणाऱ्या आणि तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदीर या दरम्यानच्या जल वाहिनीच्या सक्षमीकरण आणि मजबुतीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र, या कामासाठी सलग 10 दिवसांचा कालावधी लागणार असल्याने आणि सलग 10 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यात येणार आहे.

आता या शनिवारी 11 मार्च 2023 रोजी देखील सदर परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. यानुसार, शनिवार, 6 मे 2023 पर्यंतच्या प्रत्येक शनिवारी 'एल' विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तरी सदर परिसरातील नागरिकांनी दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी जपून व काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर खबरदारीची उपाययोजना म्हणून दर रविवारी येणारे पाणी हे गाळून आणि उकळूनच पिण्यासाठी वापरावे, असे आवाहन केले आहे.

हे पण वाचा : तुमच्या राशीसाठी शुभ रंग कोणता? वाचा

'एल' विभागातील खैरानी रोडखाली असणाऱ्या 1200 मिलिमीटर व्यासाच्या आणि 800 मीटर लांबीच्या जल वाहिनीचे सक्षमीकरण लवकरात लवकर करणे आवश्यक झाले आहे. या अंतर्गत सदर जल वाहिनीच्या अंतर्गत भागात 'क्युअर्ड इन प्लेस्ड पाईप (cured in placed pipe) या पद्धतीने जल वाहिनीचे मजबुतीकरणाचे काम करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी सलग 10 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. मात्र, सलग 10 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याच हेतुने सदर काम टप्प्या-टप्प्यामध्ये 10 दिवसात करण्यात येणार आहे.

हे पण वाचा : या राशीच्या व्यक्तींचा प्रेम विवाह होण्याची शक्यता अधिक

यामुळे 'एल' विभागातील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आजाद मार्केट या परिसरांमध्ये शनिवार, 4 मार्च पासून ते शनिवार 6 मे 2023 पर्यंत सलग 10 शनिवार पाणीपुरवठा पूर्णतः बंद असण्याबाबत यापूर्वीच महानगरपालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. त्यानुसार येत्या शनिवारी म्हणजेच 11 मार्च 2023 रोजी पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा. तसेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे.

हे पण वाचा : या सवयी बनवतात नपुंसक, तुम्हाला तर नाहीये ना?

त्याचबरोबर दर रविवारी होणारा पाणीपुरवठा हा जल वाहिनीचे तांत्रिक काम झाल्यानंतर होणार असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळूनच वापरावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी