Potholes Free Mumbai : मुंबई : मुंबई लवकरच खड्डेमुक्त (Potholes Free Mumbai) होणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) यांनी ही घोषणा केली आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी जियोपॉलीमर तंत्रज्ञान (Geopolymer Technology) वापरण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील १०० टक्के रस्ते आता काँक्रीटचे (Cement Concrete) असणार आहे. (mumbai will potholes free says cm eknath shinde Geopolymer Technology will used)
शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज आम्ही मुंबईत एक बैठक पार पाडली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि मुंबई जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील सर्व खड्डे भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच हे खड्डे जियोपॉलीमर तंत्रज्ञानाने भरले जातील असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
Today I held a meeting which was attended by Mumbai Municipal Commissioner and MLAs. It has been discussed that potholes will be filled using the Geopolymer technique. Instructions have been given to fill potholes immediately: Maharashtra CM Eknath Shinde pic.twitter.com/394FgBi278 — ANI (@ANI) July 23, 2022
जियोपॉलीमर तंत्रज्ञानात वाळू, दगड आणि पॉलीमरचा वापर होतो. या तंत्रज्ञानामुळे अवघ्या दोन तासांत खड्डा भरतो आणि त्यातून वाहतूक करण्यास अडचण होत नाही.
अधिक वाचा :रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभात आठवणींना उजाळा, कार्यकाळातील या घटना अविस्मरणीय
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात मुंबई खड्डेमुक्त करण्याची मोहीम सुरू आहे. त्यासाठी डांबरी रस्त्यांचे रुपांतर काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये होणार आहे. आतापर्यंत मुंबई महानगर पालिकेने ५० टक्क्यांहून अधिक डांबराचे रस्ते सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये बदलेले आहे.
अधिक वाचा :New Taliban dictate : तालिबानचा नवा फतवा, सरकारवर टीका केली तर होणार कडक शिक्षा
पी वेलरासू म्हणाले की मुंबईत २ हजार ५५ किमीचा रस्त्याचे जाळे आहे त्यापैकी १ हजार ३० किमी रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात आले आहे. पुढील पाच वर्षात सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते होतील असे वेलरासू यांनी नमूद केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.