Mumbai Local Train: धावत्या लोकलसमोर अचानक आली एक महिला आणि मग...., मुंबईतील Shocking VIDEO

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 30, 2022 | 16:32 IST

Mumbai Local Train: सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईतील लोकल ट्रेनसमोर अचानक एक महिला येऊन उभी राहते आणि...; मुंबईतील घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला.

Mumbai woman stands infront of running local train for attempt to suicide shocking video viral
Mumbai Local Train: धावत्या लोकलसमोर अचानक आली एक महिला आणि मग...., मुंबईतील Shocking VIDEO  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मुंबईतील धक्कादायक आणि खळबळजनक व्हिडिओ
  • धावत्या लोकल ट्रेनसमोर अचानक उभी राहिली महिला
  • महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल

Woman attempt to suicide in front of Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. याच लोकल ट्रेनने दररोज लाखोंच्या संख्येत प्रवासी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. याच लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. समोरून वेगाने लोकल ट्रेन येत असल्याचं पाहून एक महिला अचानक ट्रॅकसमोर उभी राहते. स्टेशनपासून काही अंतरावर घडत असलेली ही घटना पाहून तेथील लोकांच्या मनात एकच धडकी भरली. (Mumbai woman stands in front of running local train for attempt to suicide shocking video viral)

असं म्हटलं जात आहे की, हा व्हिडिओ दक्षिण मुंबईतील भायखळा रेल्वे स्टेशन परिसरातील आहे. येथील रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर एका महिलेने भरधाव लोकल ट्रेनसमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर लोकल ट्रेन होती. ही लोकल ट्रेन भरधाव वेगाने येत असल्याचं पाहून एक महिला धावत गेली आणि त्या ट्रॅकवर उभी राहिली. महिला ट्रॅकवर उभी होती आणि समोरून वेगाने लोकल ट्रेन येत होती. ही दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर अक्षरश: काटा आला. स्टेशनवर असलेल्या नागरिकांनी या महिलेला आवाज देत तेथून बाजूला होण्यास सांगत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. त्यासोबतच लोकल ट्रेनचा मोटरमनही जोरात हॉर्न वाजवत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, ही महिला कुणाचंही ऐकायला तयार नाहीये.

हे पण वाचा : भारतातील 'या' रेल्वे स्थानकात भुताटकी? रात्री भटकतात आत्मा?​

त्यासोबतच एक व्यक्तीही या महिलेच्या दिशेने धावत जाताना दिसत आहे. जेणेकरुन लोकल ट्रेन येण्यापूर्वी तिला ट्रॅकवरुन बाजूला केलं जाईल. महिला ट्रॅकवरुन बाजूला होत नसल्याचं पाहून मोटरमननेही गाडीचा वेग कमी केला. त्यानंतरही ही महिला तिथेच उभी असल्याचं पाहिल्यानंतर अखेर मोटरमनने एमर्जन्सी ब्रेक दाबला.

त्याचवेळी एक आरपीएफ जवान आणि मोटरमन त्या महिलेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्या महिलेला ट्रॅकवरुन बाजूला केलं. सुदैवाने मोटरमनने वेळीच प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबल्याने तिचे प्राण वाचले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी