Mumbai: बाथरूममध्ये आंघोळ करणाऱ्या महिलांचा तरुणांनी बनवला न्यूड व्हिडिओ आणि मग...

Crime News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बाथरूममध्ये आंघोळ करणाऱ्या महिलेचा न्यूड व्हिडिओ तीन जणांनी शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • महिलांचे न्यूड आणि सेमी न्यूड व्हिडिओ करत होते शूट 
  • बाथरूमच्या खिडकीत असलेल्या गॅपमधून आरोपी करत होते व्हिडिओ शूट
  • मुंबई पोलिसांनी तिन्ही आरोपींना केली अटक

Mumbai News: मोबाइल फोनवरुन महिलांचे न्यूड आणि सेमी न्यूड व्हिडिओ शूट करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांना संशय आहे की, या प्रकरणात इतरही आरोपींचा समावेश आहे. सतीश धनवेद हरिजन, सर्वनन तंगराज हरिजन आणि स्टिफन राज मुर्गेश नाडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (mumbai youth shoot video of bathing woman police arrest them)

व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास करताना संशय व्यक्त केला आहे की, आरोपी हे आपल्या मोबाइल फोनच्या सहाय्याने बाथरूमच्या खिडकीच्या गॅपमधून किंवा दरवाजाला छिद्र पाडून व्हिडिओ शूट करत होते. या प्रकरणात पोलिसांनी मोबाइल फोन, पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉप आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे.

हे पण वाचा : सोशल मीडियावर अकाऊंट नसलेले 3 स्टार क्रिकेटर

न्यूड आणि सेमी न्यूड व्हिडिओ शूट

पोलिसांच्या मते, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी 2019 आणि 2020 या कालावधीत कथितपणे आपल्या विभागातील महिलांचे न्यूड आणि सेमी न्यूड व्हिडिओ शूट करत होते. ही खळबळजनक आणि धक्कादायक घटना 28 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. जेव्हा मित्रांच्या ग्रुपमध्ये झालेल्या वाद झाला होता. त्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

हे पण वाचा : सुंदर दिसण्यासाठी दिव्या खोसला कुमार करते 'हे' काम

पोलिसांनी सांगितले की, खिडकी उघडी असताना आणि दरवाजाला छिद्र करुन आरोपी आपल्या मोबाइल फोनमधून महिलांचे व्हिडिओ शूट करत होते. तर काही महिलांचे फोटो सुद्धा काढले. काहींच्या खिडकी किंवा दरवाजाला फट पडलेली असते त्याचा फायदा आरोपींनी घेत महिलांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूट केले होते. इतकेच नाही तर या महिलांचे अनेकदा कपडे बदलतानाचेही व्हिडिओ शूट केले होते.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत तीन ते चार पीडित महिला समोर आल्या असून त्यांनी आपली तक्रार दाखल केली आहे. महिलांनी पुढाकार घेत आरोपींच्या विरोधात जबाब दिल्यानंतर तक्रार दाखल केली. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी आयटी act सह  कलम 354सी, 292 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी