मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी असून नागरिकांना उद्यापासून एकत्र जमता येणार नाहीये.मुंबई (Mumbai) शहरात उद्यापासून थेट 15 दिवसांसाठी संचारबंदी (Curfew) लागू केली जाणार आहे. बृहन्मुंबईचे पोलीस उप आयुक्त (Deputy Commissioner of Police) (अभियान) विशाल ठाकूर (Vishal Thakur) यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. या संचारबंदीचे उल्लंघन केल्यास नागरिकांकडून दंड, तसेच त्यांना शिक्षा केली जाणार आहे. (Mumbaikars have heard! Curfew to be imposed in the city for 15 days, but know why)
अधिक वाचा : सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी गँगस्टर गोल्डी ब्रारला पकडले
पोलीस उप आयुक्त ठाकूर यांच्या आदेशानुसार, शहरातील शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. या कारणानिमित्त 03 डिसेंबरपासून ते थेट 17 डिसेंबरपर्यंत या पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. पोलिसांना विविध स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार, शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पोलीस उप आयुक्त ठाकूर यांनी त्यांना असलेल्या अधिकारानुसार शहरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिलेत.
आदेशानुसार, वित्त आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याची शंका पोलीस उप आयुक्त ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. संचारबंदी करण्यात आलेल्या काळात कोणत्याही प्रकारची दंगल आणि हानी होऊ, नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली झाली आहे. यामुळे या दरम्यानच्या पाच किंवा अधिक व्यक्तीच्या हालचाली तसेच बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
अधिक वाचा : केंद्रीय आरोग्यमंत्री धडकल्या उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात
१) पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध असेल.
२) कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही.
३) कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्य, बँण्ड आणि फटाके फोडण्यास मनाई असेल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.