मुंबईकरांनो, नातेवाईकांकडे मुक्कामीच जा; मध्य आणि हार्बर मार्गांवर 'मेगाब्लॉक'

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 26, 2023 | 09:20 IST

Local Mega Block : मुंबईकरांनो उद्या रविवारच्या दिवशी फिरायला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण उद्या मध्य रेल्वे( Central Railway) विभागाकडून मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येत आहे. हर्बर लाईनवरदेखील हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

'Mega block' on Central and Harbor lines tomorrow
रविवारी दुपारपर्यंत या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद; पण का?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत जाणाऱ्या लोकल रेल्वे 10 मिनिटे उशिरा धावतील.
  • विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • सीएसएमटी ते कल्याण जाणाऱ्या गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो उद्या रविवारच्या दिवशी फिरायला किंवा नातेवाईकांकडे जाण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण उद्या मध्य रेल्वे( Central Railway) विभागाकडून मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येत आहे. हर्बर लाईनवरदेखील हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या नातेवाईकांकडे जात असाल मुक्कामीच जाण्याचा प्लान तुम्हाला करावा लागेल. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mumbaikars, stay with relatives; 'Mega block' on Central and Harbor lines tomorrow  )

अधिक वाचा  : लग्नाला उशिर कराल तर बाप बनण्यास होईल अडचण

का घेण्यात येणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 26 मार्च 2023, रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आलं आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या प्रसिद्धीनुसार मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार 26  मार्च रोजी विविध देखभालीच्या  कामं करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

अधिक वाचा  : टक्कल पडू नये यासाठी वापरा हे 10 सर्वोत्तम नैसर्गिक केस तेल

 ठाणे-कल्याण मार्गावर दुपारी 3.40 पर्यंत वाहतूक बंद 
  

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10मिनिटे उशिराने आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

अधिक वाचा  : अरर्रर सारा खतरनाक! 8 गोष्टींवर लगाम लावत घटवलं 45 किलो वजन

कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10  मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. 

कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर 4 वाजेपर्यंत ब्लॉक 
 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत  पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

अधिक वाचा  : दर्दी परिणीति चोप्रा ,एक नाही अनेकवेळा तुटलंय दिल

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.  ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम लोकल रेल्वेचा प्रवास होणार जलद अन् आरामदायी

पश्चिम रेल्वेवरील 15 डब्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवास करता येणार आहे. 15 डब्यांच्या आणखी सहा लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. अंधेरी ते विरारदरम्यान धावणाऱ्या 12 डब्यांच्या लोकलला तीन अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत. सोमवारपासून 12 डब्यांच्या सहा लोकल फेऱ्या 15 डब्यांच्या म्हणून चालवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी