munawar faruqui : कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा मुंबईत झाला शो, काँग्रेसने दिला पाठिंबा

काँग्रेस पक्षाने कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे समर्थन केले आहे. आज मुंबई त्याचा एक शो पार पाडला असून यापूर्वी त्याचे आतापर्यंत १२हून अधिक शो रद्द झाले आहेत. अखेर मुंबईत शनिवारी त्याचा एक शो पार पडला आहे. काँग्रेस पक्षाने त्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. munawar faruqui show oraganized by congress yb center mumbai

munawar farooqui
मुनव्वर फारुकी  |  फोटो सौजन्य: Twitter

munawar faruqui : मुंबई : काँग्रेस पक्षाने कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे समर्थन केले आहे. आज मुंबई त्याचा एक शो पार पाडला असून यापूर्वी त्याचे आतापर्यंत १२हून अधिक शो रद्द झाले आहेत. अखेर मुंबईत शनिवारी त्याचा एक शो पार पडला आहे. काँग्रेस पक्षाने त्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गेल्या काही दिवसांत मुनव्वरचे अनेक शो रद्द झाल्याने त्याने स्टॅण्ड अप कॉमेडी सोडण्याचा विचार केला होता. द्वेष जिंकला आणि कलाकार हरला अशी पोस्ट मुनव्वरने आपल्या इन्स्टावर केली होती. माझे काम झाले गुडबाय असेही मुनव्वरने म्हटले होते. (munawar faruqui show oraganized by congress yb center mumbai)


अखेर आज यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये मुनव्वरचा स्टॅण्ड अप कॉमेडीचा शोन पार पडला. काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर त्याचे फोटो शेअर केले आहे. तसेच आम्ही मुनव्वर फारुकीच्या शोचे आयोजन केले असून कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. आपण आपले विचार कुणावर लादू शकत नाही असे काँग्रेसने म्हटले आहे. अभिनेत्री, दिग्दर्शिका पुजा भट्टनेही मुनव्वरचे समर्थन केले आहे. काँग्रेसने भूमिका घेतल्याबद्दल पूजा भट्टने त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आपल्याला अभिवक्ती स्वातंत्र्य, लोकशाही आवाज उठवला पाहिजे, जेव्हा एखाद्या कलाकारावर दबाव आणला जात आहे अशा वेळी आपण त्यांच्या मागे ठाम पणे उभे राहिले पाहिजे असे पूजा भट्टने म्हटले आहे. 

याच महिन्यात गुरूग्रामधील एका स्टॅण्ड अप कॉमेडी शो दरम्यान आयोजकांनी त्याला बाहेर काढले होते. १९-१९ डिसेंबर दरम्यान गुरुग्राम कॉमेडी फेस्टिव्हलमध्ये त्याचा शो होता. शो रद्द झाल्यानंतर मुनव्वर फारुकीने माध्यमांशी बोलताना सांगितले की मला दररोज जिवे मारण्याच्या ५० हून अधिक  धमक्या मिळतात. त्यासाठी मी तीन वेळा माझा नंबर बदलला. काही झाले तरी माझा फोन नंबर लीक होतो, लोक मला फोन करून शिव्या घालतात असे मुनव्वरने सांगितले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी