Election: नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका कधी? समोर आली मोठी अपडेट

Municipal Corporation Election dates: राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत असताना आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

BMC, TMC Election dates: राज्यातील महागनरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अद्यापही रखडलेलाच आहे. या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. या चर्चा सुरू असतानाच जानेवारी महिन्यात महागनरपालिकांच्या निवडणुका होतील असं वृत्त समोर आलं. जानेवारी महिन्यात निवडणुका होणार असल्याचं वृत्त येताच इच्छुकांनी आपली जोरदार तयारी सुद्धा सुरू केली. मात्र, आता या निवडणुकांच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. (Municipal Corporation Election will be held in January is not true says Maharashtra cmo read details in marathi)

निवडणुका जानेवारी महिन्यात असल्याचं वृत्त तथ्यहीन

राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र, या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा : तुमची रास सांगते तुम्ही किती खोटारडे आहात​ 

बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यकाळ संपला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या अशा सूचना मे महिन्यात केलेल्या. मात्र, त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. सत्तांतर झाल्यावर नव्याने स्थापन झालेल्या सरकारने मनपांच्या वॉर्ड रचना नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निवडणुका पुढे ढकलल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी