Names of forts on ministers' bungalows, encroachment on real forts : मुंबई : महाराष्ट्र शासनाने मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या २० मंत्र्यांच्या (कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री) बंगल्यांना किल्ल्यांची नाव दिली आहेत. हा उपक्रम सुरू होण्याआधीच राज्यातील अनेक लहान-मोठ्या किल्ल्यांवर अतिक्रमणं झाली आहेत. आता अतिक्रमणांना धार्मिक स्वरुप येत आहे. शिवाजी महाराज कसे इस्लामप्रेमी होते हे दाखवून देण्याच्या नावाखाली नवनव्या कथा सांगून राज्यातील अनेक किल्ल्यांवर दर्गा-मशिदींच्या रुपाने अतिक्रमण वाढले आहे.
आधी प्रतापगड, रायगड सारखे मोठे किल्ले आणि आता छोट्या किल्ल्यांवरही थडगी बांधून, हिरवी चादर अंथरून आणि उरूस भरवून त्या किल्ल्यांचे इस्लामीकरण करणे सुरू आहे. लोहगड, कुलाबा किल्ला, शिवडी किल्ला तसेच रायगड जिल्ह्यातील सरसगड, मानगड आणि अलिबाग येथील हिराकोट या किल्ल्यांचे इस्लामीकरण करुन तर अनेक वर्षे झाली आहेत.
शिवडीचा किल्ला १५००च्या सुमारास बांधण्यात आला. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर ठरवून सय्यद जलाल शाह दर्ग्याचे प्रस्थ वाढवण्याचा उद्योग सुरू आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर साधारण १ एकर जागेत दरगाह शरीफ हजरत सय्यद जलाल शाह या नावाने दर्गा आणि त्याच्याशी संबंधित वास्तू बांधण्यात आल्या आहेत. अतिक्रमणाचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे.
दर्ग्याचे ठिकाण हे नवनाथांपैकी एका नाथांचे स्थान असल्याचे जाणकार सांगतात. पण पुरातत्व विभाग किल्ल्यावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत आहे. दर्गा सांभाळण्याच्या नावाखाली काही मुस्लिम कुटुंबांनी थेट किल्ल्यातच कायमचा मुक्काम केला आहे. प्रवेशद्वाराबाहेरच अनेक हिरवे ध्वज झळकत आहेत. प्रवेशद्वारावर दर्ग्याच्या नावाची मोठी कमान बांधली आहे. हळू हळू किल्ल्याचे अस्तित्व पुसून तिथे दर्ग्याचे अस्तित्व मोठे करण्याचे उद्योग सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे.
रायगड जिल्ह्यातील पाली येथील सरसगड, माणगाव येथील मानगड आणि अलिबाग येथील हिराकोट या गडांवरही अनधिकृत थडगी बांधली आहेत. सरसगडावर नियमित उरुस सुरू आहेत. मानगडावर थडगे बांधून त्यावर चादर चढवण्यात आली आहे, तर हिराकोट येथे थडगे बांधून आता त्या जागेभोवती भिंतींचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने दर्गा बांधण्याचे काम सुरू आहे. गडाच्या दर्शनी भागात आणि रस्त्याला अडथळा होईल अशा प्रकारे बांधकाम करुनही त्यावर कोणी कारवाई केली नसल्याचे स्थानिक सांगत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.