Congress Nana Patole On NCP : मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Maharashtra Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आरोप केली आहेत. आजदेखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपला मदत केल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. सोबतच महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहण्याबाबतही मोठं वक्तव्य केलं. नाना म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचा राजकारण करत आहे.
अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचा उल्लंघन होत आहे, त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असं नाना पटोलेंनी म्हटले आहे.काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांना करण्यात आला. तेव्हा नाना म्हणाले की, येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसतीलच, आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही.
काँग्रेसच्या शिबिराविषयी सांगताना ते म्हणाले की, काँग्रेसला देशाची चिंता आहे सध्या देशातील राज्यघटना तसेच लोकशाही धोक्यात आली आहे. श्रीलंकेसारखी स्थिती होत आहे आणि त्यावरच काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये चर्चा झाली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये 50 टक्के तरुणांना संधी देऊ, एक परिवार एक तिकीट याची अंमलबजावणी महाराष्ट्रात आगामी निवडणुकीपासून होणार असून 2 ऑक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याचं सांगण्यात येत आहे
सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेत्यांनी सरकारबद्दल नाराजी असेल तर शरद पवार यांची भेट घ्यावी, असं सांगितलं होतं. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, गरज असेल तेव्हा शरद पवार साहेब यांना भेटणार आहे. अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, नाना पटोले लोकांसाठी जगणारा कार्यकर्ता असून ते देशाला माहित आहे, मी भाजप सोडली, मी समोरून राजीनामा दिला. जे लोक माझ्याबद्दल बोलतात, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी. पहाटेच्या शपथविधी बद्दल वेळ आल्यावर दादा बोलणार असं बोलले त्यांनी लवकर बोलावं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 'ऐकला चलो रे' वर काँग्रेस ठाम आहे, असंही ते म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.