भाजपाने रामाच्या नावावर पैसे वसुलीचा ठेका घेतला आहे का? : नाना पटोले

रामाच्या नावावर पैसे गोळा करणारे हे कोण आहेत ? रामाच्या नावावर वसुलीचा ठेका भारतीय जनता पक्षाने घेतला आहे का? असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

nana patole lashes out bjp over ram mandir fund raising
भाजपाने रामाच्या नावावर पैसे वसुलीचा ठेका घेतला आहे का?   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  •  अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) निर्माणासाठी देणगी गोळा केली जात आहे.
  • काही ठिकाणी देणगीसाठी जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत.
  • नाना पटोले यांनी आज विधानसभेत राम मंदिराच्या देणगीचा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली.

 मुंबई :  अयोध्येत राम मंदिर (Ram Mandir) निर्माणासाठी देणगी गोळा केली जात आहे. काही ठिकाणी देणगीसाठी जबरदस्ती केली जात असल्याच्या तक्रारीही येत आहेत. रामाच्या नावावर पैसे गोळा करणारे हे कोण आहेत ? रामाच्या नावावर वसुलीचा ठेका भारतीय जनता पक्षाने घेतला आहे का? असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांनी केला.

नाना पटोले यांनी आज विधानसभेत राम मंदिराच्या देणगीचा प्रश्न उपस्थित करत भारतीय जनता पक्षावर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले की, राम मंदिरासाठी पैसे मागितले आणि देण्यास नकार दिल्यानंतर धमकी देण्यात आली अशी तक्रार आपल्याकडेही आली आहे. भगवान श्रीरामाच्या नावावर महाराष्ट्रात पैसे मागितले जात आहेत. त्यांना असे पैसे गोळा करण्याचा काय अधिकार आहे? राम मंदिरासाठी गोळा केला जाणारा पैसा कोणत्या चॅरिटी ट्रस्टकडून घेतला जात आहे तसेच राम मंदिरासाठी 30 वर्षांपूर्वी जमा केलेला पैसा कुठे गेला? त्याचा हिशेब भाजपने द्यावा, असेही पटोले म्हणाले.

सावरकरांच्या भारतरत्नावर काँग्रेसचे मत

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Swatantryaveer Savarkar) भारतरत्न (Bharat Ratna) देण्यावर विधानसभेत भाष्य करत समर्थन दिलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात विविध चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला समर्थन दिल्याने सत्ताधारी काँग्रेसचा (Congress) सुद्धा याला पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य करत म्हटलं, सावरकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा पाठिंबा नाही.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं, "सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेबाबत आमचे एकमत नाहीये. ती शिवसेनेची भूमिका आहे. आमची भूमिका आहे की, सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा ज्योतीबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि शाहू महाराजांना (Shahuji Maharaj) भारतरत्न मिळावा असी आहे. भारतरत्न देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे राज्य सरकारचा नाही."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी