Nana Patole : नागपूर : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी कालच भारतीय जनता पार्टीने संभाजी महाराजांचा राजकीय खून केला अशा पद्धतीचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे तोटा नफा कोणाचा होणार आहे हे भविष्य सांगेल असे सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. तसेच ज्यांनी ठरवून या पद्धतीचा प्रयत्न केला, त्याचे वर्णन श्रीमंत शाहू महाराजांनी कालच केले आहे असेही पटोले म्हणाले.
नागपुरात काँग्रेसचे सोशल मीडिया संमेलन सुरू आहे. यावेळी पटोले यांने माध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले की सध्या राणा दाम्पत्याचा हनुमान चालीसा महत्वाचा नाही. देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. भाजपच्या केंद्र सरकारने लोकांचे जगणे कठीण केले आहे, त्या विरोधात त्याबद्दल ताकदीने लढण्याची गरज आहे, त्यामुळे आमचं लक्ष त्या मुद्द्यांकडे आहे.
तसेच संभाजी महाराजांची कोंडी केली यासाठी संभाजी महाराजांचे वडील भारतीय जनता पार्टीचे नाव घेत आहे. फडणवीस शरद पवारांचे नाव घेत आहे, शरद पवार फडणवीस यांचे नाव घेत आहे, शरद पवार आणि फडणवीस यांच्यात काय संबंध आहे मला माहित नाही असेही पटोले म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील वास्तविक लपवली जात आहे, श्रीलंकेच्या जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी हे सोशल मीडिया शिबीर घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.