Nana Patole : मुंबई : नाना पटोलेंकडून (Nana Patole) मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे. गावगुंडाचे नाव मोदी असल्याचं म्हणत टीकेचे धनी ठरलेल्या नाना पटोलेंनी परत एका वाद ओढवून घेतला आहे. "ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं", असं वक्तव्य केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले पुन्हा वादात सापडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते (BJP leader) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल नाना पटोले यांना विचारलं असता नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान, नाना पटोले यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेस (Congress) प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली होती. याचवेळी त्यांना परत एकदा वादाला तोंड फोडलं आहे.
भंडाऱ्यात मोदींबद्दल एक वक्तव्य करुन वाद ओढवून घेतलेल्या नाना पटोलेंनी मोदी नाव वापरत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. मात्र ते वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल नव्हतंच असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलं आहे. पण भाजपने यावर पटोलेंविरोधात राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पुण्याच्या अलका चौकात भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली. तर नाना पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नाना पटोले यांनी पुन्हा केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाना पटोले आज मुंबईत असल्यानं इथं भाजप कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही टीका केली आहे. काँग्रेसने नाना पटोलेंची शारिरीक आणि मानसिक चाचणी करून घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.