BJP challenge to Patole : मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्याक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) हे आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत राहतात. आताही नाना चर्चेत आहेत फक्त चर्चेत नाही नाही तर अडचणीत देखील आहेत. पंतप्रधान मोदींविषयी (Prime Minister Modi) केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नाना पटोले सध्या टीकेचे धन बनले आहेत. आपण मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं त्यांनी विधान केलं होतं. त्यावरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. आपल्या विधानाविषयी पटोलेंनी स्पष्टीकरण दिलं असून हे मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसल्याचे म्हणाले आहेत. 'मी आमच्या विभागातील एका मोदी नावाच्या गुंडाबद्दल (goon) बोललो होतो', असं स्पष्टीकरण त्यांनी ट्विट करुन करुन दिलं आहे. त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही भाजप आक्रमक झाले असून पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष (Maharashtra BJP vice president) माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी केला आहे. तसेच त्यांना एक खुलं आव्हानदेखील दिलं आहे. (Nana then announce the information with the photo of 'that' goon, open challenge to Patole from BJP)
''मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो आहे. हा नाना पटोले यांचा खुलासा खोटा आहे, असा आरोप माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. नाना पटोलेंनी त्या गावगुंडाचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असं आव्हानदेखील भांडारी यांनी दिलं. स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा हातात घेऊन खून करण्याची भाष करत आहेत, ही वस्तुस्थिती भयावह आहे. कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही. केवळ हत्या, खून करण्याचे राजकारण करणे हा काँग्रेसचा स्वभाव आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत, अशी टीका भांडारी यांनी केली आहे.
भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलीस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून, अधिक तपास करुन पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. भंडारा जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक आज, मंगळवारी होत आहे. त्यानिमित्ताने 16 जानेवारीला प्रचाराच्या अखेरच्या दिवशी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील सभेत पटोले यांनी 'मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो', असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gakari) यांनी ट्विट करत नाना पटोले यांच्या अटकेची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये नितीन गडकरी यांनी म्हटलं, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पटोलेंवर गन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी." देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून बावनकुळे आणि इतर भाजपा नेत्यांनी पोलिसांना केली.
पटोलेंचे स्पष्टीकरण
मी पंतप्रधान मोदींबाबत असे म्हटले नाही - पटोले
"मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षांत आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्षं झाली राजकारण करत आहे. पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करत आहे. म्हणून मी मोदी यांना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभे आहे...." दरम्यान, प्रचारसभेदरम्यान आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, तर मोदी नावाच्या एका गावगुंडाबाबत बोललो, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.