Nanar Project : नाणार प्रकल्प रत्नागिरीतच! राजापुरातील बारसूचा प्रस्ताव; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 30, 2022 | 09:45 IST

भाजप(BJP) आणि शिवसेनेच्या (ShivSena) युती सरकारमध्ये (Government) सर्वात जास्त चर्चेत राहिलेला नाणार रिफायनरी प्रकल्पाविषयी (Nanar refinery project) नवीन माहिती समोर आली आहे. नाणार प्रकल्प भाजपचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असला तरी त्याचा दोऱ्या आता शिवसेनेच्या (Shiv Sena) हातात आहेत.

Nanar project in Ratnagiri only
नाणार प्रकल्प रत्नागिरीतच पण..., सीएमचं थेट पीएमला पत्र   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नाणार रिफायनरी प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळला होता.
  • रिफायनरीसाठी (Nanar Project) लागणारी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्याची तयारी
  • प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेनं नाणार प्रकल्पााला विरोध केला होता.

CM Letter to PM For Nanar Project : भाजप(BJP) आणि शिवसेनेच्या (ShivSena) युती सरकारमध्ये (Government) सर्वात जास्त चर्चेत राहिलेला नाणार रिफायनरी प्रकल्पाविषयी (Nanar refinery project) नवीन माहिती समोर आली आहे. नाणार प्रकल्प भाजपचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असला तरी त्याचा दोऱ्या आता शिवसेनेच्या (Shiv Sena) हातात आहेत. या प्रकल्पाविषयी मिळालेल्या नव्या माहितीनुसार, हा प्रकल्प रत्नागिरीतच होणार आहे पण, त्याचं ठिकाण मात्र बदलण्यात येणार आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना 14 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र लिहिले आहे. 

दरम्यान, हा नाणार रिफायनरी प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळला होता. मात्र आता रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. 14 फेब्रुवारीलाच हे पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  मुख्यमंत्र्यांनी पत्रात नाणार रिफायनरीसाठी (Nanar Project) लागणारी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा आणि भागांचा या पत्रामध्ये उल्लेख केल्याचंही सूत्रांनी सांगितले आहे. 

Read Also : संजय राऊत अन् वरुण गांधींच्या डिनरमुळे भाजपच्या गोटात गडबडी

रिफायनरी प्रकल्पासाठी 14 हजार एकर जागा देण्याची सरकारची तयारी असल्याचे समजतं आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता रत्नागिरीतच होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. नाणार इथला तेलशुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेनं नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारचं मनपरिवर्तन झाल्यानं या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचं वक्तव्य केलं होतं. 

नाणार रिफायनरीचं काय होणार? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात

"नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. नाणारमध्ये नको, या सातत्यानं होणाऱ्या मागणीमुळे आपण तिथून तो हलवला आहे. लोकवस्ती असल्याने नाणारमधून बाहेर हलवण्यात आले आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणे सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढे जायचे आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन." 

Read Also : Petrol-Diesel Price : पेट्रोल आठ दिवसात सहा रुपयांनी महागलं

नाणार प्रकल्पाला विरोध दोन मुद्द्यावर होतोय. एक म्हणजे, पर्यावरण आणि दुसरा प्रदूषण. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, "रिफायनरीचे प्रस्ताव वारंवार येत असल्याने त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली आहे. कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला हानी होणार नाही, याची काळजी घेऊनच आपण पुढे जाऊ. अशा पद्धतीने योजना आखूनच पुढे जाणार आहोत."  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी