Narayan Rane and Nitesh Rane sarcastic remarks on Shiv Sena rebellion : मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह महाराष्ट्राबाहेर गेले आहेत. त्यांनी शिवसेनेविरोधात उघडपणे बंड पुकारले आहे. या बंडावर राणे पितापुत्रांनी मार्मिक टिप्पणी केली आहे.
'संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने; असे ट्वीट केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले. तर संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार,
विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार; असे ट्वीट नारायण राणेंचा पुत्र आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
राणे पितापुत्रांनी शिवसेनेतील बंडासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संजय राऊत हेच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत बंड झाल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले तरी राज्यात बिकट परिस्थिती निर्माण होणार नाही. लवकरच राज्यात नवे सरकार स्थापन होईल; असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
याआधी शिवसेनेने एकनाथ शिंदेंना पक्षाच्या गटनेतेपदावरून हटवून चौधरी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली आहे. पण ही नियुक्ती नियमबाह्य आहे. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार माझ्या सोबत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.