ST Employee Strike: शरद पवार तोडगा काढत नाहीत ते फक्त खेळवतात- नारायण राणे

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 23, 2021 | 10:15 IST

ST Employee Strike:राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावरून आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे.” असं राणे यांनी म्हटले आहे.

ST Employee Strike: Narayan rane Criticized to Sharad Pawar
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन राणेंचा शरद पवारांना टोला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संपावरुन नारायण राणे अनिल परब यांच्याशी चर्चा करणार
  • एसटी कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी नारायण राणे पंतप्रधान मोदींशी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलणार.
  • शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे-नारायण राणे.

ST Employee Strike: मुंबई : राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजून तोडगा निघालेला नाही. कर्मचारी ऐकत नसल्याने सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटीच्या संपावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. नेहमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणारे नारायण राणे यांनी आता शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावरून आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे.” असं राणे यांनी म्हटले आहे. तर, एसटी संपावार तोडगा काढण्यासाठी केंद्राने मार्ग काढावा असेही राणे म्हणाले आहेत.

 केंद्रीयमंत्री राणे पुढे म्हणाले की, “शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाहीत. ते निर्देश देऊ शकत नाहीत का? ज्यांनी सरकार बनवलं ते सांगू शकत नाहीत का की कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या.”तसेच, “केंद्र सरकारने थेट महाराष्ट्र सरकाला निर्देश द्यावेत की हा प्रश्न त्वरीत मिटवा किंवा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ. जो मार्ग अवलंबवायचा त्याबद्दल मी स्वत: पंतप्रधान मोदींशी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल आणि यातून मार्ग लवकरच काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना यातून वाचवावं एवढं मी सांगेन. राज्यामध्ये जे कोण परिवहनमंत्री आहेत, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्याशी देखील बोलेन.” असंही यावेळी राणे यांनी सांगितले.

राज्यातील एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात जवळपास चार तास बैठक चालली. या बैठकीस परिवनहन मंडळाचे अधिकारी देखील उपस्थितीत होते. बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेची देखील माहिती दिली. मात्र, अद्यापही ठोस असा काही निर्णय झाला नसल्याचे दिसून आले.

दरम्यान, तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने परीक्षा दिलेल्या पण अद्याप नोकरीत न घेतलेल्या अडीच हजार उमेदवारांना कंत्राटी पद्धतीचा करार करुन सेवेत सामावून घेणार असल्याचे संकेत दिले. महामंडळाने मोठ्या संख्येने खासगी बस तसेच त्या बससोबत खासगी चालक आणि वाहक यांना कंत्राटी स्वरुपात सेवेत घेऊन एसटी सेवा संप काळातही सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तोटा होत असल्याचे कारण देणारे महामंडळ संप काळात खासगी वाहनांवर मोठा खर्च करण्यासाठी आर्थिक नियोजन करत आहे. या प्रकारामुळे संप करत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महामंडळाच्या कारभाराविषयी आणखी नाराजी वाढली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी