Narayan Rane met Raj Thackeray and Jogendra Kawade met the Chief Minister Eknath Shinde : महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. कारण शनिवार 31 डिसेंबर 2022 रोजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची तर माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकार घेणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.
नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी दीड तास चर्चा केली. ही चर्चा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी झाली. नंतर थोडा वेळ गॅलरीत उभे राहून नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी गप्पा मारल्या. चर्चेनंतर नारायण राणे निघून गेले, त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींना भेटणे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे टाळले.
काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कोकणचा दौरा केला होता. या दौऱ्याबाबत तसेच लवकरच होणार असलेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीबाबत नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नारायण राणे आणि राज ठाकरे या दोघांचे राजकीय विरोधक उद्धव ठाकरे आहेत. यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांची कोंडी करण्याबाबत नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता पण व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते, दलित समाजातील नेते, माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झाली. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येऊ शकते का याबाबत कवाडे आणि मुख्यमंत्री यांच्यात तासभर चर्चा झाली. 'लवकरच होणार असलेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. चित्र पुढील काही दिवसांत आणखी स्पष्ट होईल, असे कवाडे यांनी चर्चेनंतर मीडियाला सांगितले.
कवाडेंच्या हालचालींचा अंदाज आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सुभाष देसाईंशी मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी जागा वाटपावर प्राथमिक चर्चा केल्याचे वृत्त आहे. सुभाष देसाई हे राज्याचे माजी उद्योगमंत्री तसेच उद्धव ठाकरेंचे समर्थक असलेले ज्येष्ठ नेते आहेत.
Pausha Putrada Ekadashi 2023 : कधी आहे 2023 मधील पहिली एकादशी?
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.