Narhari Zirwal । नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाला धक्का, कायद्यावर ठेवला बोट 

Narhari Zirwal On Maharashtra Political crisis : एकनाथ शिंदे यापुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत कायद्यावर बोट ठेवून काही प्रमाणात शिंदे गटाला झटका दिला आहे.

Narhari Jirwal's role shocks Shinde group, puts finger on law
नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाला धक्का 
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे यापुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत कायद्यावर बोट ठेवून काही प्रमाणात शिंदे गटाला झटका दिला आहे.
  • कायद्यावर बोट ठेवत झिरवाळ म्हणाले,  पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो.
  • गटनेत्यानं प्रतोदांची नेमणूक करायची असते.

Narhari Zirwal On Eknath Shinde Maharashtra Political crisis : एकनाथ शिंदे यापुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत कायद्यावर बोट ठेवून काही प्रमाणात शिंदे गटाला झटका दिला आहे. कायद्यावर बोट ठेवत झिरवाळ म्हणाले,  पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो. गटनेत्यानं प्रतोदांची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हे शिवसेनेचे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. (Narhari Jirwal's role shocks Shinde group, puts finger on law)

झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, नितीन देशमुख यांनी सांगितलं आहे की माझी सही इंग्रजीत आहे आणि पत्रावरील सही मराठीत आहे. त्यामुळं माझी सही ग्राह्य धरु नये. त्यामुळं मी ते तपासून पाहणार आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असे झिरवाळ म्हणाले. झिरवाळ म्हणाले की, गटनेता म्हणून जे पत्र देण्यात आलेले आहे, यामध्ये अपक्ष आमदारांच्या देखील सह्या आहेत. शिवाय आणखी एक बाब नितीन देशमुख यांनी नमूद केलेली बाब म्हणजे माझी ती सहीच नाही याची देखील मी पडताळणी करणार आहे. कारण जर हे खरे असेल तर संख्या कमी होणार आहे. शिवाय अपक्ष आमदार देखील अशा सह्या करू शकत नाहीत. त्यामुळे पत्राबाबत शंका आहे. मी याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय देणार आहे, असे ते म्हणाले. 

झिरवाळ यांनी गटनेता आणि प्रतोद यांच्या  की, कायद्यानुसार पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो. गटनेत्यानं प्रतोदांची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे. अजय चौधरी हे गटनेते आहेत. सुनील प्रभूंनी दिलेल्या सहीचं पत्र मी स्विकारलं आहे. दोन तृतीअंश आमदारांचा दावा अद्याप माझ्याकडं आलेला नाही. असा दावा करणं त्यांचा प्रश्न आहे. माझ्याकडे आल्यावर मी घटनेत असेल त्याप्रमाणे अभ्यास करुन निर्णय घेईल. जे सह्यांचं पत्र माझ्याकडं आलंय त्यात सह्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं त्यातही अभ्यास करुन मी निर्णय घेणार आहे, असं झिरवाळ आहे. यावर तर कुणालाही शंका येऊ शकते. कुणाचा अधिकार तिथं पोहोचू शकतो, त्याचा कायदेशीर दृष्ट्या अभ्यास करुनच निर्णय घेणार आहे, असंही झिरवाळ म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी