Nariman Point to Virar in 1 hr, Colaba in 5 min; Three more Sea Links to ease Mumbai roads soon : मुंबईत सध्या वांद्रे ते वरळी हा सी लिंक कार्यरत आहे. शिवडी ते न्हावा शेवा हा सी लिंक डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. या व्यतिरिक्त मुंबईला आणखी 3 सी लिंक मिळणार आहेत. यामुळे मुंबईतील सी लिंकची संख्या 5 होईल. सी लिंकमुळे मुंबईकरांचा रस्तेमार्गे होणारा प्रवास वेगवान होईल. सर्व सी लिंक कार्यरत झाल्यावर कुलाब्यातून विरारला तासाभरात जाता येईल. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सी लिंकमुळे सुपरफास्ट होईल.
मुंबईत वर्सोवा ते वांद्रे, वर्सोवा ते विरार आणि नरिमन पॉइंट ते कुलाबा असे 3 सी लिंक तयार होणार आहे. एमएमआरडीएने (Mumbai Metropolitan Region Development Authority - MMRDA) तिन्ही सी लिंकसाठी टेंडर प्रक्रिया तसेच बांधकामपूर्व तयारी या प्रक्रियांना सुरुवात केली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सी लिंक. हा रस्ता वांद्रे ते वरळी या सी लिंकला जोडला जाईल. यामुळे पश्चिम उपनगरांतून थेट दक्षिण मुंबईत जाणे सोपे होईल. शहरी भागात जात असलेली वाहने सी लिंकवरून पुढे सरकतील आणि मुंबईतल्या अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होईल.
वर्सोवा ते वांद्रे सी लिंक हा 17.17 किमी लांबीचा रस्ता आहे. कार्टर रोड आणि जुहूसह 4 ठिकाणी वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकला एन्ट्री आणि एक्झिट पॉइंट असतील. वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकचा 9.6 किमी लांबीचा भाग समुद्रावर असेल तर उर्वरित रस्ता हा जमिनीवर असेल. हा सुमारे 7 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल. या रस्त्यावरून दररोज 50 हजार वाहने जातील.
वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकला जोडणारा वर्सोवा ते विरार सी लिंक 43 किमी लांबीचा आहे. हा 21 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या रस्त्यावरून दररोज 60 हजार वाहने जातील. वर्सोवा ते वांद्रे या सी लिंकला चारकोप, उत्तन, वसई या भागांमध्ये 6 लेन कनेक्टर आणि विरारमध्ये 8 लेन कनेक्टर असतील.
नरिमन पॉइंट ते कुलाबा सी लिंक चार लेनचा असेल. एका दिशेला 2 लेन आणि दुसऱ्या दिशेला 2 लेन असा हा रस्ता असेल. हा 1.6 किमी लांबीचा रस्ता असेल. या रस्त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. सध्या वाहतूक कोंडीमुळे गर्दीच्या वेळेत नरिमन पॉइंट ते कुलाबा या प्रवासाला साधारण 30 मिनिटे लागतात. पण नरिमन पॉइंट ते कुलाबा सी लिंकमुळे हा प्रवास 5 मिनिटांत पूर्ण होईल. नरिमन पॉइंट ते कुलाबा सी लिंक हा 284.55 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल. सर्व सी लिंक कार्यरत झाल्यावर कुलाबा किंवा नरिमन पॉइंट येथून तासाभरात विरारला पोहोचणे शक्य होणार आहे.
अनिल अंबानींच्या कंपनीचा 19 डिसेंबरला लिलाव
SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.