शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करणारे नार्वेकरही कधीकाळी होते शिवसैनिक; अध्यक्षपदाआधी केलाय सेना, राष्ट्रवादी पक्षाचा प्रवास

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 03, 2022 | 13:33 IST

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभेच्या (Legislative Assembly) अध्यक्षपदी (Speaker ) अखेर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेनेचे (Shiv Sena) राजन साळवी (Rajan Salvi) मैदानात होते.

narvekar who defeated the Shiv Sena candidate, was once a Shiv Sainik
कमी वयात विधानसभा अध्यक्ष होणारे नार्वेकर आधी होते शिवसैनिक  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले.
  • राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत.

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभेच्या (Legislative Assembly) अध्यक्षपदी (Speaker ) अखेर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेनेचे (Shiv Sena) राजन साळवी (Rajan Salvi) मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. 45 वर्षीय नार्वेकर 20 वे विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. कमी वयात अध्यक्षपद मिळवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे. 

आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं 'राज्य' असणार आहे. शिरगणती करत नार्वेकर यांच्या बाजूने 164 मतं पडली. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. यात नार्वेकर यांचा विजय झाल्यानं विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या 'चाव्या' आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत.

विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.  हुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सभागृहात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांना खुर्चीपर्यंत नेले. यापूर्वी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष काँग्रेस नेते नाना पटोले हे होते.

Read Also: ताजमहालच्या तळघरात हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत का?

शिवसेना व्हाया राष्ट्रवादी व्हाया भाजप असा राजकीय प्रवास

राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपची वाट धरली होती. सेनेत असताना आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

Read Also : ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पाचं काम पुन्हा ‘हाय स्पीड’ने सुरु होणार

कोण आहेत राहुल नार्वेकर 

शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात 
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार  
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई  

कुटुंबही राजकारणात

राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. तर राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी