Nana Patole Controversial statement On Mahatma Gandhi : नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा वध केला, नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 30, 2022 | 23:53 IST

काँग्रेसने (Congress) महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) वध अशा शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला आहे. पण महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच (Death anniversary) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोलें (Nana Patole)कडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे.

Nana Patole Controversial statement
नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे.
  •  पटोलेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता

Nana Patole Controversial statement :  काँग्रेसने (Congress) महात्मा गांधींचा (Mahatma Gandhi) वध अशा शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला आहे. पण महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच (Death anniversary) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोलें (Nana Patole)कडून गांधीजींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. नथुराम गोडसेंनी (Nathuram Godse) महात्मा गांधींचा वध केला असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. पटोलेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.  कार्यकर्त्यांना संबोधित करतांना नाना पटोले यांनींच महात्मा गांधींचा वध झाला असे शब्द वापरले आहेत. 

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक -

नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. नाना पटोले यांना बोलताना भान राहत नाही, असा टोला भाजपकडून लगावण्यात आला आहे. नाना पटोले यांच्या पोटातील ओठावर आलेय का? असा प्रश्न भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. या वक्तव्यामुळे नाना पटोले यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. 

आज 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. सत्य आणि अहिंसा यांचे प्रेरणास्त्रोत अशी गांधीजींची ओळख आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान असलेल्या महात्मा गांधी यांची आजच्याच तारखेला नथुराम गोडसेनं हत्या केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी