आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईत मेट्रो चाचणी आणि ९२४९ घरांच्या नोंदणीचा शुभारंभ 

मुंबई
Updated Sep 11, 2019 | 11:47 IST

नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या बेलापूर पेंधर मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी आणि ९ हजार २४९ सदनिकांच्या अर्ज नोंदणीचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

CIDCO
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवी मुंबईतली मेट्रो चाचणी आणि ९२४९ घरांच्या नोंदणीचा शुभारंभ   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • बेलापूर पेंधर मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
  • ९ हजार २४९ सदनिकांच्या अर्ज नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.
  • सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये ९५ हजार घरे बांधण्यात येणार आहे.
  • आज संध्याकाळी ५ वाजता मेट्रो डेपो तळोजा येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

नवी मुंबई आणि पनवेलच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या बेलापूर पेंधर मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसंच सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये ९५ हजार घरे बांधण्यात येणार आहे. यातील ९ हजार २४९ सदनिकांच्या अर्ज नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. आज संध्याकाळी ५ वाजता मेट्रो डेपो तळोजा येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

बेलापूर ते पेंधरदरम्यान नवी मुंबईतील पहिल्या प्रकल्पाचं काम करण्यात आलं आहे. ११ किलोमीटरच्या या मार्गावर सिडकोतर्फे ११ मेट्रो स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे.  २०२० पर्यंत या मार्गावरून मेट्रो धावायला सुरूवात होणार असल्याचं सिडकोनं म्हटलं आहे. नवी मुंबई मेट्रो एकूण २६.२६ किमीचा असून चार मार्गाचा आहे. या प्रकल्पासाठी एकूण खर्च ८ हजार ९०४ कोटी रूपये करण्यात आला आहे. तर एकूण चार मार्गापैकी ११.१० किमी लांबीचा आणि ११ स्थानकांह ३०६३ कोटी रूपये खर्च आहे.

cidco advt

सिडकोनं मे २०११ मध्ये नवी मुंबई मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला सुरूवात केली. या मार्गावर चालवण्याकरिता चीनमधून मेट्रोचे डबे मागवण्यात आले होते. तळोजा कारशेडमध्ये हे डबे पूर्वीच दाखल झालेत. ऑगस्टमध्ये मेट्रोसाठी तळोजा येथे उभारण्यात आलेल्या विद्युत सबस्टेशनमध्ये नुकताच विद्युत पुरवठा झाल्यावर गेल्या दोन दिवसांपासून कारशेड ते पेंधर मेट्रो स्टेशन या दोन किलोमीटर मीटर अंतरावर मेट्रो इंजिनद्वारे पूर्व चाचणी सुरू होती. 

९ हजार घरांसाठी आजपासून नोंदणी 

सिडको नवी मुंबईत ९५ हजार घरं बांधणार आहे. यापैकी ९,२४९ घरांची प्रत्यक्ष नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोच्यावतीनं रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भूखंड, ट्रक टर्मिनल आणि इतर ठिकाणी ९५ हजार घरे बांधण्यात येणार आहे.

अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी ही राज्यातली सर्वांत मोठी योजना आहे. सिडको महागृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३,१७६ घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि ६ हजार ७३ घरं अल्प उत्पन्न गटासाठी आहेत.  तसंच या ९५ हजार घरांपैकी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकासाठी ६९,५८८ आणि अल्प उत्पन्न गटासाठी २५,२७८ घरे आहेत.

या योजनेअंतर्गत तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली या भागात ही घरं आहेत. अर्जदारांना नोंदणीकरिता, योजनेकरिता शुल्क भरणा आणि सोडतीची संपूर्ण माहिती करिता www.lottery.cidcoindia.com संकेतस्थळाला भेट देऊ शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...