नवी मुंबईच्या उरणमध्ये पुलावर दहशतवादाशी संबंधित मेसेज, सतर्कतेचे आदेश

मुंबई
Updated Jun 04, 2019 | 17:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

उरण येथील एका पुलाच्या खांब्यावर आयसिसशी संबंधित मेसेज आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी येथे तातडीने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

message on uran bridge
उरणच्या ब्रिजवर दहशतवाद्यांशी संबंधित मेसेज 

थोडं पण कामाचं

  • पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास केला सुरू
  • या भागात अनेक संवेदनशील ठिकाणे
  • उरण भागात पोलिसांनी घोषित केला हायअलर्ट

मुंबई: नवी मुंबईच्या उरण येथे पोलिसांना एका पुलाच्या खांबावर दहशतवाद्यांशी संबंधित मेसेज मिळाला आहे. हा मेसेज समोर आल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे. नवी मुंबईच्या खोपाटा पुलाच्या खाली एका खांबावर लिहिण्यात आलेल्या मेसेजमध्ये दहशतवादी संघटना आयसिस आणि अबू बकर अल बगदादीचे नाव लिहिण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. हा मेसेज कोणी लिहिला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेल नाही. मात्र हा मेसेज आढळल्यानंतर पोलिसांनी जवळच्या परिसरात सुरक्षा अधिक वाढवली आहे. 

नवी मुंबईच्या उरण तालुक्यात ONGC, नौदलाचे शस्त्रागार, जेएनपीटी बंद यांसारखी संवेदनशील ठिकाणे आहेत. यामुळे भिंतीवर लिहिलेला हा मेसेज पोलिसांनीही गांभीर्याने घेतला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

पुलाच्या खाली काळ्या मार्करने लिहिले की

या मेसेजमध्ये धोनी जन्नत में आऊट, आम आदमी पार्टी, केजरीवाल, हाफिज सईद, रहीम कटोरी, राम कटोरी असेही लिहिले आहे. यासोबतच देवनागरी आणि इंग्रजीमध्ये सांकेतिक आकडेही लिहिण्यात आले आहेत. मेसेजसह काही जहाज, एअरपोर्ट आणि पेट्रोल पंप यासारखी चित्रे बनवण्यात आली आहेत. यासोबतच एका फोटोत कुर्ला, गोरखपूर सारख्या ठिकाणांना हायलाईट करण्यात आले आहे. 

हा मेसेज आढळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जवळच्या परिसरात सुरक्षेची गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच पोलीस दलालाही अलर्ट करण्यात आले आहे. पोलिसांची वेगळी टीम आणि नवी मुंबई क्राईम ब्रांच या प्रकरणाची चौकशी करत आहे. या भागात अनेक संवेदनशील ठिकाणे आहेत त्यामुळे या मेसेजकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याची माहिती नवी मुंबई पोलिस अधिकाऱ्यांना नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. 

दरम्यान, हा मेसेज कोणीतरी केलेल प्रँकही असू शकतो. मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने हा मेसेज लिहिताने कोणी पाहिले का याबाबत आम्ही लोकांचे जबाब घेत असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. 

दहशतवादविरोधी पथकाच्या महाराष्ट्र युनिटने आधीच या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. तर नवी मुमबई पोलिसांची क्राईम ब्रांच वेगळा तपास करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
नवी मुंबईच्या उरणमध्ये पुलावर दहशतवादाशी संबंधित मेसेज, सतर्कतेचे आदेश Description: उरण येथील एका पुलाच्या खांब्यावर आयसिसशी संबंधित मेसेज आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी येथे तातडीने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles