मुंबई : तब्बल १२ दिवसानंतर अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अखेर बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास होऊ लागल्याने सुटका झाल्यावर त्वरित त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा यांची तळोजा कारागृहातून (Taloja Jail Administration)सुटका झाल्यानंतर त्यांनी थेट लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) गाठले. त्यावेळी पती रवी राणा यांना पाहताच खासदार नवनीत राणा यांच्या अश्रूचा बांध फुटला. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना धीर दिला आणि त्यांनी त्याचे डोळे पुसले, एक वेगळ चित्र मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दिसले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे. (Navneet Rana burst into tears when she saw her husband Ravi Rana, watch the video)
अधिक वाचा : नवनीत राणा हात जोडून आल्या जेलमधून बाहेर
रवी राणा यांनी तळोजा जेल प्रशासनावर (Taloja Jail Administration) गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास सुरु झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची विनंती जेल प्रशासनाला करण्यात आली. मात्र, तरीही त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं नाही, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केलाय.
अधिक वाचा : हे ६ स्टार क्रिकेटर्स आधी बनले वडील नंतर केले लग्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’येथे हनुमान चालिसाचं पठण करणार असे आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिले होते. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
शासकीय कामात अडथळासह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अखेर 12 दिवसांच्या जेलवारीनंतर राणा दाम्पत्याला बुधवारी जामीन मंजूर करण्यात आला. त्यांची आज गुरूवारी सुटका करण्यात आली. मात्र, नवनीत राणा यांना मानेचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्यांना भेटायला भाजपचे नेते किरीट सोमय्या आले होते. त्यांनी इंग्रजांच्या काळात जसा जेलमध्ये अत्याचार होत होता. त्या प्रकारे रवी राणा यांना अनुभव आला असल्याचे सोमय्या म्हटले आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.