तुरुंगातून सुटलेल्या नवनीत राणांनी मिडियासमोर जोडले हात, घराऐवजी थेट हॉस्पिटल गाठलं

Hanuman Chalisa controversy महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांची जामीन मंजूर झाल्यानंतर  आज १३ दिवसांनंतर जेलमधून सुटका झाली. 

Navneet Rana joins hands in front of media, admitted to Lilavati Hospital for medical treatment
तुरुंगातून सुटलेल्या नवनीत राणांनी मिडियासमोर जोडले हात, घराऐवजी थेट हॉस्पिटल गाठलं  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • नवनीत राणा व रवी राणा यांची जेलमधून सुटका
  • प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या तुरुंगातून घरी न जाता थेट मुंबईतील लीलावती रुग्णालयात गेल्या.
  • रवी राणांनी खिशातून काढली हनुमान चालीसा पुस्तिका

मुंबई : अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आज १३ व्या दिवशी तुरुंगातून बाहेर आले आहेत. मुंबईतील बोरिवली न्यायालयाने त्यांची सुटका करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांनी मिडियासमोर हात जोडले. (Navneet Rana joins hands in front of media, admitted to Lilavati Hospital for medical treatment)

अधिक वाचा : Raj Thackeray: टोल वरील आंदोलन, फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन आणि आता भोंग्यांवरील मनसेच्या आंदोलनाचाही फज्जा ? काय आहे ग्राऊंड रीऍलिटी

तसेच खासदार राणा यांना स्पॉन्डिलायसिस नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. वैद्यकीय उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी जामीन मिळाल्यानंतर लीलावती रुग्णालयात मेडिकलसाठी जात असताना आमदार रवी राणा यांच्यासोबत हनुमान चालिसाची प्रत दिसली. ही प्रत त्यांनी सोबत घेतली.  त्यांना रुग्णालयात भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आले होते.

अधिक वाचा : महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुका नाही होणार 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्यावरून झालेल्या वादातून दोघांना 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक करण्यात आली होती. नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बुधवारीच जामीन मिळाला, परंतु न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकली नाही. सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. राणा दाम्पत्याला ५०-५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. दंडाधिकाऱ्यांकडून सुटकेचा आदेश मिळाल्यानंतर दोन पथके भायखळा आणि तळोजा कारागृहात पोहोचली.

अधिक वाचा : Ajit Pawar : वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला आदेश


या अटींवर जामीन मंजूर 

न्यायालयाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्य पुन्हा असा गुन्हा करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय ते साक्षीदार किंवा पुराव्याशी छेडछाड करणार नाहीत. राणा दाम्पत्य या विषयावर पत्रकार परिषद घेणार नाही किंवा मीडिया किंवा सोशल मीडियावर कोणतेही वक्तव्य करणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. कोणत्याही अटीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्याचा जामीन रद्द करण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी