Navneet Rana : संकटमोचकाच्या चालिसा पठणामुळे वाढलं संकट; नवनीत राणांचं 'डी' गँग कनेक्शन, मुंबई पोलीस करणार चौकशी

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 27, 2022 | 12:08 IST

संकटमोचक हनुमानाच्या चालिसा पठणासाठी आग्रही असलेल्या अमरावतीचे (Amravati) खासदार (MP) नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा(Ravi Rana) याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) त्यांच्याविरोधात कारवाईची मोठी मोहीमचं उघडल्याचं दिसून येत आहे.

Navneet Rana's 'D' gang connection
संकटमोचकाने वाढवलं नवनीत राणाचं संकट, बाहेर आलं डी कनेक्शन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दाऊद कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाकडे (EOW) करण्यात येणार.
  • युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित हे नाव असून त्याच्याकडून नवनीत राणांनी हे ८० लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
  • संजय राऊत यांनी मंगळवारी रात्री ट्विट करून नवनीत राणा यांचे युसूफ लकडावालाशी असलेले आर्थिक कनेक्शन उघड केले होते.

Navneet Rana D Connection : मुंबई : संकटमोचक हनुमानाच्या चालिसा पठणासाठी आग्रही असलेल्या अमरावतीचे (Amravati) खासदार (MP) नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा(Ravi Rana) याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) त्यांच्याविरोधात कारवाईची मोठी मोहीमचं उघडल्याचं दिसून येत आहे. अद्याप खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची दाट शक्यता आहे, म्हणजेच काय संकटमोचकाच्या चालिसा पठण करण्यासाठी गेलेल्या नवनीत राण आता स्वत: संकटात सापडल्या आहेत. 

नवनीत राणा यांच्या दाऊद कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गु्न्हे अन्वेषण विभागाकडे (EOW) करण्यात येणार आहे. नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळची व्यक्ती समजली जाणारी युसूफ लकडावालाकडून ८० लाखांचे कर्ज घेतले होते. या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या EOW कडे चौकशी करण्यात येणार आहे. युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित हे नाव असून त्याच्याकडून नवनीत राणांनी हे ८० लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी राणा यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्राचा दाखला देत हे आरोप केले आहेत. हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी या प्रकरणाचा तपास करणार का असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडीकडून राणा दाम्पत्य आणि डी गॅंगच्या संबंधाबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

संजय राऊत यांनी मंगळवारी रात्री ट्विट करून नवनीत राणा यांचे युसूफ लकडावालाशी असलेले आर्थिक कनेक्शन उघड केले होते.  महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांकडे याबाबत लवकरच तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर EOW कडून चौकशी सुरू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या EOW कडून आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी सुरू आहे. मग सक्तवसुली संचलनालयाने (ED) या प्रकरणाची चौकशी का केली नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर आता या व्यवहाराकडे राज्यातील तपासयंत्रणांच्या नजरा वळल्या आहेत. 

आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील या आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही चौकशी सुरु झाल्यास राजद्राहोच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या नवनीत राणा यांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, युसूफ लकडावालाचे दाऊदशी संबंध असल्याचं आणि तो डी गँगचा फायनान्सर असल्याचे सांगितले जायचं. मनी लॉन्ड्रिंगसह पैशाच्या अफरातफरीच्या प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. कॅन्सरग्रस्त असल्याने आर्थर रोड कारागृहात त्याचा मृत्यू झाला. राणा दाम्पत्याकडून किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून युसूफ लकडावाला याच्याकडून घेतलेल्या कर्जाबाबत अद्यापपर्यंत कोणतेही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

मात्र, महाविकास आघाडी सरकारकडून लवकरच नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांच्यातील व्यवहाराबाबत तक्रार दाखल केली जाऊ शकते. त्याआधारे आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करू शकते. या पार्श्वभूमीवर आता नवनीत राणा काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी