Ashish Shelar on Nawab Malik : नवाब मलिक यांनी आरोपांचा कबुलीजबाब दिला!

Ashish Shelar demand CM filed FIR aginst Nawab malik । रोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis )यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक (Nawab malik ) यांना ते फटाके भिजलेले वाटले पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता.

Nawab Malik confesses to allegations say ashish Shelar
नवाब मलिक यांनी आरोपांचा कबुलीजबाब दिला : आशिष शेलार 
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी करावी!
  • भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची मागणी
  • नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता.

Ashish Shelar demand CM filed FIR aginst Nawab malik ।  मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis )यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक (Nawab malik ) यांना ते फटाके भिजलेले वाटले पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच  मलीक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shela)यांनी चढवला. (Nawab Malik confesses to allegations say ashish Shelar)

आमदार अँड आशिष शेलार यांनी दुपारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची दखल घेऊन पोलीसांमार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी एकुण चार  आरोप केले. त्यापैकी पहिला सरदार शहावल्ली हा मुंबईच्या 93 च्या बाँम्ब मधील शिक्षापात्र आरोपी असून त्याच्याशी नवाब मलिक यांचे आर्थिक व्यवहार झाले.

दुसरा महमद सलिम पटेल हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा ड्रायव्हर व फ्रंट मँन, पाँवर आँफ पँटर्नी होल्डर आणि अटक झालेला आरोपी यांच्या मार्फत व्यवहार करुन फायदा करुन दिला

तीसरा आरोप मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपीं जे टाडा खाली अटक झाले त्या आरोपींची जी जमीन सील होणार सरकार जमा होईल म्हणून त्यांना मदत करण्यासाठी त्यांची जमीन स्वतःकडे वळवली, घेतल्याचे दाखवली आणि चौथा आरोपींची जमीन कवडीमोल किंमतीने घेऊन त्यांचा फायदा केला.

यातील  तीन आरोप नवाब मलिक यांनी कबूल केले आणि हसीना पारकर या विषयात बोलण्याची हिंम्मत नसल्याने त्याबद्दल मौन राखून तो आरोप मौन धरु कबूल केला. म्हणजे नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत म्हणजे.. कबूल.. कबूल.. कबूल.. असा कबुलीनामा होता, अशी टीका आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

नवाब मलिक यांनी या आरोपांच्या समर्थ जे सांगितले त्यामध्ये ते म्हणतात की त्या जागेत आमची दुकाने होती त्यासह संपूर्ण कंम्पाऊंटची मालकी मिळवली. तेही 30 लाख ठरवून 20 लाख एवढ्या कवडीमोल किमंतीत मालकी मिळवली. मुंबईततील हे कसले "नवाबी भाडेकरु ?"  ज्यांना सरकारी दरापेक्षा कमी दरात जागेची मालकी मालकाने दिली. मुंबईतील भाडेकरुंचा प्रश्न एवढ्या सहजपणे सुटत असेल तर मग मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जीआर काढून वर्षानुवर्षे न्यायालयात लढणाऱ्या मुंबईतील भाडेकरुंना हाच नियम लावावा, अशी उपरोधिक मागणी ही आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

मुंबईतील खाजगी जागेवरील झोपडपट्टीची मालकी देण्यासाठी आज सुध्दा सरकार रेडीरेकनरच्या 25% रक्कम जमा करुन घेते मग नवाब मलिक यांना एवढी जागा कशी काय हस्तांतरीत करुन मिळाली असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी या व्यवहारातील सांगितल्या जाणाऱ्या हास्यास्पद बाबी समोर आणल्या. 

 या व्यवहारात सरदार शहावल्ली याचे वडील वाँचमेन असल्याने त्यानी आपले नाव जागेला चढवले म्हणून त्याला पैसै दिले हे मग हा मुंबईतील वाचमनला नवा नवाबी धंदा सांगताय का? असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी नवाब मलिक सांगत असलेल्या नवाबी दर, नवाबी धंदे, नवाबी व्यवहार, नवाबी भाडेकरु, नवाबी मालक याची खिल्ली उडवली. तसेच हा विषय एवढा सरळ नसून मुंबईला 1993 ला बाँम्ब स्फोट झाले आणि त्यातील दोषी आरोपींना मदत करण्यासाठी 2005 ला हे व्यवहार झालेले असल्याने हा विषय गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी कराली अशी मागणी सुध्दा आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाद्ये, प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय उपाध्याय भाजपा नगरसेवक. संदिप लेले आदी उपस्थितीत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी